मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Vidhan Parishad Oath Ceremony: पंकजा मुंडे, सदाभाऊ, मिलिंद नार्वेकर यांच्यासह महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 11 आमदारांनी घेतली शपथ

Vidhan parishad Oath Ceremony: विधान परिषदेसाठी 11 नवनिर्वाचित आमदारांनी रविवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Vidhan Parishad Oath Ceremony: पंकजा मुंडे, सदाभाऊ, मिलिंद नार्वेकर यांच्यासह महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 11 आमदारांनी घेतली शपथ

Vidhan parishad Oath Ceremony: विधान परिषदेसाठी 11 नवनिर्वाचित आमदारांनी रविवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. 11 पैकी नऊ आमदार महायुतीचे आहेत. तर दोन महा विकास आघाडीचे आहेत.

मुंबई :- विधान परिषदेच्या Vidhan Parishad निवडून आलेल्या 11 आमदारांनी रविवारी (28 जुलै) विधानभवनात शपथ घेतली. विधान परिषदेचे उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेही उपस्थित होते. 12 जुलै रोजी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती आघाडीने 11 पैकी नऊ जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्या सर्वांचा विजय झाला होता.

महायुतीत भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश आहे. महाराष्ट्रात 11 विधान परिषदेच्या जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडणूक लढले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाकडून पाठिंबा असलेले जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

छायाचित्रे · 1/11

Arrow Keys ⟵ ⟶

1.पंकजा मुंडे-भाजप

  1. योगेश टिळेकर-भाजप
    3.अमित गोरखे-भाजप
    4.परिणय फुके-भाजप
    5.सदाभाऊ खोत-भाजप
    6.भावना गवळी-(शिंदे) शिवसेना
    7.कृपाल तुमण-(शिंदे) शिवसेना
    8.शिवाजी गर्जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार)
    9.राजेश व्हिटेकर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, (अजित पवार)
    10.प्रज्ञा सातव-काँग्रेस,
    11.मिलिंद नार्वेकर-(उद्धव ठाकरे) शिवसेना पक्ष.
  2. महाविकास आघाडीच्या १२ उमेदवारांपैकी एका जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात लढत झाली. निकराच्या लढतीत मिलिंद नार्वेकर विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे उमेदवार पाटील यांचा निवडणुकीत पराभव झाला. एमएलसी निवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याउलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजप महायुतीचा वर्चस्व ठरला. Vidhan Parishad Latest News

    शेअर करा