मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

जेजुरीत विजयाचा जल्लोष ठरला जीवघेणा! भंडाऱ्याचा भडाका उडून नवनिर्वाचित नगरसेवकांसह अनेकजण होरपळले

•भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे उडाला आगीचा भडका; चेंगराचेंगरीत चिमुरडीचा पाय फ्रॅक्चर, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा संताप

V
Vivek

1 मिनिट वाचन

जेजुरीत विजयाचा जल्लोष ठरला जीवघेणा! भंडाऱ्याचा भडाका उडून नवनिर्वाचित नगरसेवकांसह अनेकजण होरपळले

•भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे उडाला आगीचा भडका; चेंगराचेंगरीत चिमुरडीचा पाय फ्रॅक्चर, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा संताप

जेजुरी | जेजुरी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित उमेदवारांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे उधाण आले होते. 'येळकोट येळकोट घेरी मल्हार'च्या जयघोषात जेजुरी गडाचा पायथा आणि नंदी चौक परिसर पिवळ्या धमक भंडाऱ्याने न्हाऊन निघाला होता. मात्र, याच जल्लोषात भंडाऱ्यामध्ये असलेल्या ज्वलनशील भेसळीमुळे अचानक आगीचा गोळा निर्माण झाला. या आगीत दोन नवनिर्वाचित नगरसेवकांसह जवळच उभ्या असलेल्या महिला आणि बालकांना आगीच्या झळा बसल्या.

दुर्घटना नेमकी कशी घडली?

निकालात विजयी झालेले उमेदवार आणि त्यांचे समर्थक गडाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होण्यासाठी जमले होते.परंपरेप्रमाणे महिला औक्षण करत असताना आणि कार्यकर्ते भंडाऱ्याची उधळण करत असतानाच, भंडाऱ्याचा दिव्याशी संपर्क आला आणि क्षणात आगीचा मोठा भडका उडाला. या भडक्यामुळे परिसरात एकच हाहाकार उडाला. आगीपासून वाचण्यासाठी लोकांनी धाव घेतली, मात्र नंदी चौक परिसरात असलेल्या प्रचंड अतिक्रमणामुळे लोकांना पळायला जागा मिळाली नाही. या चेंगराचेंगरीत एका 10 वर्षीय मुलीचा पाय फ्रॅक्चर झाला असून जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भेसळयुक्त भंडाऱ्याचा 'सैतान'

जेजुरीत मिळणाऱ्या भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणात रासायनिक आणि ज्वलनशील पदार्थांची भेसळ केली जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी केली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) वारंवार दाद मागूनही कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जेजुरी देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला असून, गडावर अशा प्रकारचा भेसळयुक्त भंडारा आणण्यास बंदी घालणारे फलक लावणार असल्याचे सांगितले.

प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह

जेजुरीतील अरुंद रस्ते आणि त्यावर असलेले विक्रेत्यांचे अनधिकृत स्टॉल्स यामुळे कालच्या दुर्घटनेची तीव्रता वाढली. जर नगरपालिकेने वेळीच ही अतिक्रमणे हटवली असती, तर चेंगराचेंगरी टाळता आली असती, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या दुर्घटनेमुळे विजयाचा आनंद असलेल्या जेजुरीत आता भीती आणि संतापाचे सावट असून, जिल्हा प्रशासन यावर काय ठोस पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Thane News : अंबरनाथ-बदलापुरात भाजपाची मुसंडी! शिंदेंच्या बालेकिल्ल्यात 'कमळ' फुलले; महापालिका जागावाटपात भाजपाचा दबाव वाढणार

शेअर करा