मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane News : अंबरनाथ-बदलापुरात भाजपाची मुसंडी! शिंदेंच्या बालेकिल्ल्यात 'कमळ' फुलले; महापालिका जागावाटपात भाजपाचा दबाव वाढणार

• फडणवीस-चव्हाण रणनीती यशस्वी; नवी मुंबईत, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपाकडून 'स्वबळा'ची चाचपणी सुरू

V
Vivek

1 मिनिट वाचन

CM eknath Shinde On

•फडणवीस-चव्हाण रणनीती यशस्वी; नवी मुंबईत, ठाणे, कल्याण-डोंबिवलीत भाजपाकडून 'स्वबळा'ची चाचपणी सुरू

ठाणे/कल्याण | ठाणे जिल्ह्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असलेली पकड ढिली करत, अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निकालांमुळे संपूर्ण जिल्ह्यात 'शत-प्रतिशत' भाजपचा नारा पुन्हा एकदा घुमू लागला असून, आगामी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपात भाजप आता मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे.

शिंदे सेनेची रणनीती अंगलट

अंबरनाथ आणि बदलापूर हे वर्षानुवर्षे शिवसेनेचे बालेकिल्ले राहिले आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अंबरनाथमध्ये स्वतः तळ ठोकला होता, तर बदलापुरात वामन म्हात्रे यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन भाजप आमदार किसन कथोरे यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटीत भाजपवर दबाव वाढवण्यासाठी ही खेळी खेळली गेली होती, मात्र मतदारांनी भाजपला कौल दिल्याने आता शिंदे गटाला भाजपसमोर नरमाईची भूमिका घ्यावी लागणार आहे.

फडणवीस आणि चव्हाणांचा करिष्मा
या विजयाचे मुख्य शिल्पकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाहिले जात आहे.

बदलापूर: फडणवीसांनी येथे सभा घेऊन 'विकास अजेंडा' मांडला, ज्याला मतदारांनी प्रतिसाद दिला.

अंबरनाथ: अत्यंत अटीतटीच्या लढतीत फडणवीसांनी 'भयमुक्त शहर' असा नारा दिला होता. शिंदे पिता-पुत्रांचा प्रभाव असूनही येथे भाजपने विजय खेचून आणला, जो रवींद्र चव्हाण यांच्यासाठी मोठा राजकीय विजय मानला जात आहे.

हेही वाचा: U19 Asia Cup Final : अंडर-19 आशिया कप: भारताची घोर निराशा; पाकिस्तानने 191 धावांनी नमवून जिंकली ट्रॉफी

शेअर करा