मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Ulwe Police Station : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उलवे पोलीस ठाण्यात महिला पोलीसांचा गौरव

Ulwe Police Station Celebrates Ahilyabai Holkar Jayanti : मराठी भाषिक एकीकरण संघटनेतर्फे सामाजिक सलोखा व पोलीसांना पाठबळ देण्याचा संकल्प

V
Vivek

1 मिनिट वाचन

Ulwe Police Station : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त उलवे पोलीस ठाण्यात महिला पोलीसांचा गौरव

Ulwe Police Station Celebrates Ahilyabai Holkar Jayanti : मराठी भाषिक एकीकरण संघटनेतर्फे सामाजिक सलोखा व पोलीसांना पाठबळ देण्याचा संकल्प

पनवेल (उलवे) :— पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषिक एकीकरण संघटना, उलवे यांच्या वतीने उलवे पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. Ulwe Police Station Celebrates Ahilyabai Holkar Jayanti या कार्यक्रमात पोलीस विभागाचे सामाजिक योगदान लक्षात घेता संघटनेने आपल्या पोलीस बांधवांना कायम साथ देण्याची ग्वाही दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांचे संघटनेला मार्गदर्शन व शुभेच्छा

कार्यक्रमात उलवे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक करताना मार्गदर्शन केले. त्यांनी मराठी भाषिक एकीकरण संघटनेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पोलीस हे केवळ कर्मचारी नसून आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहेत. ते दिवस-रात्र कर्तव्य बजावत असल्यामुळेच आपण सुरक्षित जीवन जगू शकतो, हे संघटनेने अधोरेखित केले.

या प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या जीवनातील शौर्य, सामाजिक समतेसाठी केलेले प्रयत्न आणि प्रशासनातील कार्यतत्परता यावर प्रकाश टाकण्यात आला.

इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवींची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ व डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे. 'जगातील महान स्त्रियांच्या यादीत अहिल्यादेवींचे नाव प्रथम येईल,' असे गौरवोद्गार त्यांनी काढले आहेत.

शेअर करा