मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uddhav Thackeray : ‘कर्जमाफीसाठी पंचांगात मुहूर्त पाहणार का?’; उद्धव ठाकरेंचा सरकारला संतप्त सवाल, प्रति हेक्टरी 50 हजार मदतीची मागणी

•‘आत्महत्या करू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी’; बँकांकडून नोटीस आल्यास कार्यालयात आणून देण्याचे आवाहन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uddhav Thackeray

•‘आत्महत्या करू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी’; बँकांकडून नोटीस आल्यास कार्यालयात आणून देण्याचे आवाहन

लातूर :- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत, सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “कर्जमाफीसाठी योग्य वेळ कधी येणार, पंचांगात मुहूर्त पाहणार आहात का?” असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला केला.

‘प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या’

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "मराठवाड्यात पहिल्यांदाच इतके मोठे नुकसान झाले आहे." त्यांनी पंजाबचे उदाहरण देत सरकारला घेरले. "जर पंजाबमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळत असेल, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ती का दिली जात नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, सरकारकडून जाहीर झालेली मदत ही फारच तुटपुंजी असल्याचे त्यांनी म्हटले.

‘आत्महत्या करू नका, आम्ही सोबत आहोत’

बँकांकडून शेतकऱ्यांना येत असलेल्या नोटिसांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. “मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की, कोणीही आत्महत्या करू नये. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. जर बँकांकडून नोटीस आली, तर ती आमच्या कार्यालयात आणून द्या, आम्ही त्याचे पुढे काय करायचे ते बघू,” असे आश्वासन त्यांनी दिले.

कर्जमाफीचा इशारा

कर्जमाफीवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. "अजूनही शेतकरी ती कर्जमाफी विसरलेला नाहीये, आता शेतकऱ्यांची मागणी आहे की सरसकट कर्जमाफी करावी," असे ते म्हणाले. जर सरकारने कर्जमाफी केली नाही, तर शिवसेना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा: Pune News : रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना मोठा दिलासा; अखेर जामीन मंजूर

शेअर करा