मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रकृती बिघडली! - मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

Eknath Shinde Visit Uday Samant At Hospital : नागपूर अधिवेशनानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर, उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता; शिंदे यांनी केली आस्थेवाईकपणे विचारपूस

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uday Samant : उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रकृती बिघडली! - मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली भेट

Eknath Shinde Visit Uday Samant At Hospital : नागपूर अधिवेशनानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर, उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता; शिंदे यांनी केली आस्थेवाईकपणे विचारपूस

मुंबई :- राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत Uday Samant यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी रात्रीपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

छायाचित्रे · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

अधिवेशनानंतर अचानक अस्वस्थ

नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंत्री उदय सामंत सक्रियपणे सहभागी झाले होते. मात्र, अधिवेशनानंतर शनिवारी रात्री अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. यामुळे त्यांना अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजात सहभागी होता आले नाही.

उपमुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन उदय सामंत यांची भेट घेतली. त्यांनी सामंत यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे विचारपूस केली, तसेच डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करून त्यांच्या उपचारांचा आढावा घेतला. शिंदे यांनी सामंत यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "उदय सामंत हे अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यदक्ष मंत्री आहेत. त्यांच्या तब्येतीत होणारी सुधारणा ही दिलासादायक बाब आहे."

सामंत लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा जनसेवेत रुजू व्हावेत, यासाठी रत्नागिरीतून आणि राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सर्व वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्या असून, डॉक्टरांनी त्यांना उद्या (बुधवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

शेअर करा