मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

वाहतूक विभागातील दोन पोलिसांनी मार्केटयार्ड येथे वाचवला एक जीव

रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीस केले रुग्णालयात दाखल

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

वाहतूक विभागातील दोन पोलिसांनी मार्केटयार्ड येथे वाचवला एक जीव

रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीस केले रुग्णालयात दाखल

पुणे: मार्केट यार्ड वाहतूक विभागातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे एका नागरिकाचे प्राण वाचल्याची घटना समोर आली असून, त्यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोमवारी दुपारी सुमारे १२.२० वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड चौक येथे कर्तव्यावर असलेले हेड कॉन्स्टेबल तानाजी राऊत व पोलिस कॉन्स्टेबल दीपक गाडगे यांनी रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या एका व्यक्तीस पाहिले. परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी कोणतीही वेळ न दवडता संबंधित व्यक्तीस तात्काळ राव नर्सिंग होम, पुणे येथे उपचारासाठी दाखल केले.

वेळेवर मिळालेल्या या मदतीमुळे संबंधित रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य झाले. रुग्णाचे नाव दत्तात्रय रणधावे (वय ४७ वर्षे, रा. चऱ्होली) असे असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत राव नर्सिंग होमचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पाटील यांनी सांगितले की, “पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता व मानवतावादी दृष्टिकोन अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या वेळेवरच्या मदतीमुळे रुग्णाचा जीव वाचला.”

सदर दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या कर्तव्यदक्षतेचे व सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Two traffic police officers saved a life at Market Yard

शेअर करा