मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांचे मोबाईल हिसकावून पसार झालेले दोन आरोपी गजाआड

पनवेल ( संजय कदम ) : पनवेल वाहतूक शाखा येथे नेमणूक असलेले पोहवा युवराज येळे व पोहवा अमीर स्सुल मुलाणी यांचा मोबाईल डिझेल चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनी हिसकावून ते पसार झाले होते .

V
Vivek

1 मिनिट वाचन

कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसांचे मोबाईल हिसकावून पसार झालेले दोन आरोपी गजाआड

पनवेल ( संजय कदम ) : पनवेल वाहतूक शाखा येथे नेमणूक असलेले पोहवा युवराज येळे व पोहवा अमीर स्सुल मुलाणी यांचा मोबाईल डिझेल चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनी हिसकावून ते पसार झाले होते . याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपीना ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार आहे त्याचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
पुष्पक नगर समोरील ब्रिजवर, पनवेलच्या दिशेने येणाऱ्या वाहिनीवर, जे.एन.पी.टी. रोडवर, कर्तव्य बजावत असताना पोहवा युवराज येळे व पोहवा अमीर स्सुल मुलाणी हे जे.एन.पी.टी. रोडवर दोन्ही बाजुला अनधिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करित असताना यातील आरोपींपैकी एक आरोपी उभा असलेला मिक्सर वाहन क्र. एम एच ०४ एफ बी २३३१ या वाहनातून डिझेल काढत असताना त्यांनी पाहिल्यानंतर त्यास हटकले असता नमुद आरोपी पळून जावुन मिक्सर वाहन शेजारीच उभी असलेली पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये बसत असताना यातील या दोघांनी त्यास पकडले असता त्याने या दोघांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करुन त्या दोघांना धक्का देवुन खाली पाडुन त्याच्या ताब्यातील मोबाईल त्यांच्या संमतीशिवाय हातातून हिसकावुन जबरी चोरी करुन नमुद पांढऱ्या रंगाच्या कारच्या चालक सिटवर बसलेला सह आरोपी सोबत पळुन गेले होते . या बाबतचा तपास वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे , पोहवा अविनाश गंथाडे , नितीन वाघमारे , महेंद्र वायकर ,परेश म्हात्रे , योगेश दिवेकर,विनोद देशमुख ,पोना सम्राट डाकी ,पोशी चंद्रशेखर चौधरी आदींच्या पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना पोहवा परेश म्हात्रे याना आरोपी साहिल लाड (वय २३ ) रा. कर्जत यांच्या बाबत माहिती मिळली असता आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले असता त्याने त्याचा सहकारी मुक्शशीर मुसव्वीर टोले, (वय २७) वर्षे रा. घाटकोपर याची माहिती दिली . या दोघांनी गुन्हा कबुल केला असून मुख्य सहकारी जय पंडित याचा शोध पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे करीत आहेत .

शेअर करा