मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune PMC : महापालिकेत १०६ कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या

१७२ सफाई सेवक झाले मुकादम

M
mubarak

1 मिनिट वाचन

pune pmc

१७२ सफाई सेवक झाले मुकादम

निलेश राऊत
पुणे, महाराष्ट्र मिरर
: महापालिका प्रशासनाने विविध विभागांत एकाच ठिकाणी तीन वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या १०६ अभियंत्यांच्या अन्य विभागात बदल्या केल्या आहेत. तसेच घनकचरा विभागामध्ये कार्यरत असलेल्या १७२ सफाई सेवकांनाही मुकादम पदावर बढती देण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेच्या २२ उपअभियंत्यांच्या बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या आहेत.

एकाच विभागात तीन वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांची बदली
महापालिकेच्या विविध विभागांत विभागात तीन वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांची अन्य विभागांमध्ये बदली केली. प्रशासनाने बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांची बैठक घेऊन त्यांच्या चॉइसनुसार बदलीचा पर्याय ठेवला. यामध्ये संबंधित अभियंत्यांनी पूर्वी ज्या विभागात सेवा केली आहे, ते विभाग सोडून उर्वरित विभागात बदलीसाठी प्राधान्यक्रम मागवून या बदल्या केल्या, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी दिली.

छायाचित्रे · 1/1

Arrow Keys ⟵ ⟶

थोरात यांनी सांगितले की, या नियमित बदल्या होत्या. एकाच विभागामध्ये तीन वर्षांहून अधिक काळ सेवा झालेल्या प्रत्येक विभागातील २० टक्के अभियंत्यांच्या बदल्या केल्या आहेत. प्रशासनाच्यावतीने शहर स्वच्छतेसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सफाई सेवकांतूनच परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुकादमपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी होता. सुमारे १७२ सफाई सेवकांचीदेखील मुकादमपदी बढती देण्यात आली आहे. तसेच २२ उपअभियंत्यांच्या बदल्या समुपदेशाने करण्यात आल्या आहेत.

Transfers of 106 Junior Engineers in the Municipal Corporation

शेअर करा