मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'

Operation Sindoor Latest Update : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने बुधवारी (7 मे 2025) हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'

Operation Sindoor Latest Update : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारतीय सैन्याने बुधवारी (7 मे 2025) हवाई हल्ला करून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

ANI :- पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, बुधवारी (7 मे 2025) भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केले. भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ला केला.हे दहशतवादी अड्डे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमध्ये होते. लष्कराच्या या हवाई हल्ल्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव देण्यात आले आहे. हे हवाई हल्ले त्या दहशतवादी तळांवर करण्यात आले जिथून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ल्यांचे नियोजन करण्यात आले. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हवाई हल्ल्यात एकूण 9 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.

भारतीय लष्कराने म्हटले आहे की, हवाई हल्ल्यात कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले नाही. लक्ष्यांची निवड आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमध्ये भारताने बराच संयम दाखवला आहे.पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय लष्कराने हे पाऊल उचलले आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना जबाबदार धरले जाईल या आमच्या वचनबद्धतेचे आम्ही पालन करत आहोत, असे लष्कराने म्हटले आहे.

शेअर करा