मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

गझल-गीतांतून उलगडली महामानवांची महती

'रथ भीमाचा हा पुढे' नेऊ कार्यक्रमातून गौतम बुद्ध व डॉ.

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

गझल-गीतांतून उलगडली महामानवांची महती

'रथ भीमाचा हा पुढे' नेऊ कार्यक्रमातून गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कलाकारांची मानवंदना

निलेश राऊत
पुणे: बुद्ध पौर्णिमेनिमित्त ‘विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती’तर्फे आयोजित ‘बुद्ध धम्म संध्या’ कार्यक्रमात गझल व गीतांच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रभावी मांडणी करण्यात आली. पुणे विद्यापीठातील तथागत गौतम बुद्ध विहार येथे रविवारी झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

“वंदितो तुला मी गौतमा”, “मुक्ती दिन हा मानवतेचा”, “सांगा बहुजनास आता संपला वनवास”, “चंदन वृक्ष समान होता भीमराव” अशा गीतांमधून कलाकारांनी महामानवांच्या कार्याचा आणि मानवतेच्या संदेशाचा सुरेल आविष्कार सादर केला. ज्येष्ठ गझल गायक अशोक गायकवाड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गीत-गझलांच्या माध्यमातून बुद्धांच्या करुणा व आंबेडकरांच्या समानतेच्या विचारांचा प्रभावी संदेश दिला.

रसिकांची दाद
कार्यक्रमाची सुरुवात “तथागत तुझा धम्म आचरणी” या गीताने झाली. त्यानंतर “हृदयी वसे माझ्या बुद्ध पिंपळाचा पार”, “भीमा तुझ्या कृपेने जगणे झाले सोपे”, “अंधारमय नभात उजळून भीम गेला” यांसारख्या गीतांनी वातावरण भारावून गेले. “भीमा सारखा हिरा अलौकिक जगात दुसरा कोणीच नाही” या ओळींनी रसिकांची दाद मिळवली.

मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष व उपमहापौर परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, संत गाडगेबाबा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, नगरसेवक सनी निम्हण आदी मान्यवर उपस्थित होते.

संगीतसाथ निखिल वाघमारे (तबला), श्याम चंदनशिव (ढोलक), अवधूत धायगुडे (साईड रिदम), अमोल मांढरे (कीबोर्ड), अझरुद्दीन शेख (बासरी) व रुपेश मोरे (हार्मोनियम) यांनी केली. धम्मचारिणी गुणमेघा यांनी निवेदन, तर दीपक म्हस्के यांनी सूत्रसंचालन केले.

शेअर करा