मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

त्र्यंबकेश्वर नगरीत सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य शंखनाद; कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

•राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर, तर त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; देशभरातील संत-महंतांची अलोट उपस्थिती

V
Vivek

1 मिनिट वाचन

त्र्यंबकेश्वर नगरीत सिंहस्थ कुंभमेळ्याचा भव्य शंखनाद; कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

•राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंडावर, तर त्र्यंबकेश्वरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; देशभरातील संत-महंतांची अलोट उपस्थिती

नाशिक :- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि पवित्र धार्मिक क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर नगरीत शनिवारी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाचा अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात शुभारंभ झाला. त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक कुशावर्त तीर्थावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी धार्मिक विधींनुसार धर्मध्वजारोहण करण्यात आले.

शृंगेरी पीठाचे उत्तराधिकारी शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती यांच्या पावन उपस्थितीत हा सोहळा पार पडला. याप्रसंगी देशोभरातून आलेले दहा संन्यासी आखाड्यांचे श्रीमहंत, प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छायाचित्रे · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभपर्वाचा सोहळा

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या ऐतिहासिक ध्वजारोहण सोहळ्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि राज्याचे अर्धे मंत्रिमंडळ नाशिक-त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले आहे. तत्पूर्वी, नाशिकमधील पवित्र रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य धर्मध्वजारोहण पार पडले.

सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शुक्रवारी रात्रीच नाशिकमध्ये दाखल झाले होते. कुशावर्त तीर्थावर पूजेचा विधी पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू त्र्यंबकेश्वरला भेट देऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत काही काळ विश्रांती घेऊन सायंकाळी त्या गोदावरी नदीच्या भव्य 'गोदाआरती'ला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा: MNS Deepotsav : मनसेचा मोठा निर्णय; राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे दादरच्या शिवाजी पार्कातील प्रसिद्ध दीपोत्सव रद्द

शेअर करा