मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

वाद घालून जनगणना कामात अडथळा आणू नये: महापालिका

घोषित व अघोषित झोपडपट्टी क्षेत्रांमधील काही ठिकाणी प्रगणकांना जनगणनेच्या कामात मिळत नसल्याचे दिसून आले आहे

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

वाद घालून जनगणना कामात अडथळा आणू नये: महापालिका

घोषित व अघोषित झोपडपट्टी क्षेत्रांमधील काही ठिकाणी प्रगणकांना जनगणनेच्या कामात मिळत नसल्याचे दिसून आले आहे

निलेश राऊत
पुणे: पुणे शहर महापालिका क्षेत्रात दिनांक १६/०५/२०२६ ते दि.१४/०६/२०२६ या कालावधीत जनगणना - २०२७ अंतर्गत प्रथम फेरीच्या क्षेत्र कामकाजाकरता प्रगट माहिती घेण्यासाठी घरांना भेटी देत आहेत. मात्र घोषित व अघोषित झोपडपट्टी क्षेत्रांमधील काही ठिकाणी निवासीधारक जनगणना प्रगणकांना गणनाघरांना क्रमांक देणे व जनगणने कामी माहिती घेणे बाबत सहकार्य करीत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सर्व झोपडपट्टीधारकांना कळविण्यात येते की, जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत जनगणनेचे कामकाज करण्यात येते. नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन सहकार्य करणे आवश्यक असल्याचे महापालिकेने आवाहन केले आहे.

सदर संकलित माहिती ही गोपनीय स्वरूपात ठेवण्यात येते. त्या अनुषंगाने प्रगणकांबरोबर वाद घालून जनगणना कामात अडथळा निर्माण करू नये. जनगणनेचे काम हे राष्ट्रीय स्वरूपाचे असून विहित मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य आहे. तरी जनगणना - २०२७ च्या कामकाजामध्ये जनगणना प्रगणकांना नागरिकांनी सहकार्य करावे असे पुणे महापालिकेतर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा