मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Scam News : ठाण्यात पॉन्झी स्किम प्रकरणी आरोपीस ७ वर्षांचा सश्रम कारावास; ५ लाख रुपयांचा दंडही

ठाणे, २२ ऑगस्ट : ठाण्यातील त्रिमूर्ती रत्न ज्वेलर्स या संस्थेच्या सोन्याच्या स्किमच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या संतोष सदानंद शेलार (वय ५६) यास जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे यांनी ७ वर्षांचा सश्रम कारावास व दंड ठोठावला आहे.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Scam News : ठाण्यात पॉन्झी स्किम प्रकरणी आरोपीस ७ वर्षांचा सश्रम कारावास; ५ लाख रुपयांचा दंडही

ठाणे, २२ ऑगस्ट : ठाण्यातील त्रिमूर्ती रत्न ज्वेलर्स या संस्थेच्या सोन्याच्या स्किमच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या संतोष सदानंद शेलार (वय ५६) यास जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे यांनी ७ वर्षांचा सश्रम कारावास व दंड ठोठावला आहे. Thane Gold Scam Latest News

प्रकरणाचा तपशील

फेब्रुवारी २०१८ ते एप्रिल २०१९ या कालावधीत, आरोपीने त्रिमूर्ती ज्वेलर्सच्या स्किममध्ये १५ महिने दरमहा १,००० रुपये भरल्यास मुद्दलासह व्याज किंवा सोन्याचे दागिने परत मिळतील, असे आश्वासन देऊन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी व त्याच्या मुलाकडून एकूण ३०,००० रुपये जमा करून घेतले. मात्र मुदत संपल्यानंतर आरोपीने ना पैसे परत दिले, ना सोन्याचे दागिने.

याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९७/२०१९ भा.द.वि. कलम ४०६, ४२०, ३४ सह महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (MPID) Act कलम ३ व ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली होती.

न्यायालयाचा निर्णय

सदर प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जी.टी. पवार यांनी केली. त्यांनी आरोपी संतोष शेलार यास भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये ७ वर्षे सश्रम कारावास व ५ लाखांचा दंड (दंड न भरल्यास २ वर्षे साधा कारावास) तसेच MPID कलम ३ अंतर्गत ६ वर्षांची शिक्षा व १ लाख रुपयांचा दंड (दंड न भरल्यास १ वर्ष कारावास) ठोठावला.
तर इतर दोन आरोपी — दिपक शांताराम गोपाळ व अनिल दिनकर शिंदे — यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

पोलिसांची कामगिरी

तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक एम.एम. विसपुते, सध्याच्या सहा. पोलीस निरीक्षक विद्या पाटील, तसेच आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहरातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अथक परिश्रमांमुळे या प्रकरणात भक्कम पुरावे न्यायालयासमोर सादर करता आले. सरकारी अभियोक्ता अधिवक्ता विवेक कडू यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा