मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Politics : ठाण्यात महायुतीचा 'राडा'! भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिंदे गटाच्या शाखाप्रमुखांना मारहाण

Thane Naryan Pawar Latest News : 'बीएसयूपी' सेलिब्रेशनवरून वाद विकोपाला; नारायण पवारांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Politics : ठाण्यात महायुतीचा 'राडा'! भाजपच्या माजी नगरसेवकाकडून शिंदे गटाच्या शाखाप्रमुखांना मारहाण

Thane Naryan Pawar Latest News : 'बीएसयूपी' सेलिब्रेशनवरून वाद विकोपाला; नारायण पवारांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार

ठाणे :- राज्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण Ravindra Chavan विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यात तणाव सुरू असतानाच, आता थेट ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. भाजपचे माजी आणि ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची तक्रार नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

बीएसयूपी (BSUP) घरांसाठी 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर झाल्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हा निर्णय झाल्याने शिवसैनिक (शिंदे गट) विविध ठिकाणी सेलिब्रेशन करत होते. काल (20 नोव्हेंबर) पाच पाखाडी विभागातील लक्ष्मी नारायण बिल्डिंगमध्ये असेच सेलिब्रेशन सुरू असताना, भाजपचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी तेथे धाव घेतली. त्यांनी 'तुम्ही सेलिब्रेशन कसे करता?' असे विचारत शिवसेना शाखाप्रमुख हरेश महाडीक आणि उपविभागप्रमुख महेश लहाने यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीनंतर शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी एनसी (Non-Cognizable Offence) दाखल केली आहे. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत वाद विकोपाला गेला असून, हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

शेअर करा