मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Police News : ठाण्यात ड्रग्ज तस्करांविरुद्ध मोठी कारवाई! 4 कोटी 12 लाखांचे 'एमडी' जप्त; ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचा दणका

Thane Police Latest News : 2 किलो 62 ग्रॅम मेफेड्रॉनसह तिघांना बेड्या; चरई परिसरात सापळा रचून पोलिसांनी उधळला विक्रीचा डाव

V
Vivek

2 मिनिट वाचन

Thane Police News : ठाण्यात ड्रग्ज तस्करांविरुद्ध मोठी कारवाई! 4 कोटी 12 लाखांचे 'एमडी' जप्त; ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचा दणका

Thane Police Latest News : 2 किलो 62 ग्रॅम मेफेड्रॉनसह तिघांना बेड्या; चरई परिसरात सापळा रचून पोलिसांनी उधळला विक्रीचा डाव

ठाणे :- ठाणे शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. ठाणे गुन्हे शाखेच्या Thane Crime Branch अंमली पदार्थ विरोधी पथकाने चरई परिसरात धाड टाकून तब्बल 4 कोटी 12 लाख 40 हजार रुपये किमतीचे 2 किलो 62 ग्रॅम 'मेफेड्रॉन' (MD) जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली असून त्यांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. Thane Police Latest News

गोपनीय माहिती आणि थरारक सापळा

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार गिरीष पाटील यांना चरई येथील एमटीएनएल ऑफिससमोर काही इसम ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिपक डुम्मलवाड आणि पथकाने 23 मार्च 2026 रोजी सायंकाळीच्या सुमारास परिसरात सापळा रचला.

दोघांना रंगेहाथ पकडले, तिसरा 'बॅकवर्ड लिंक'मध्ये अटकेत
पोलिसांनी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात एमडी पावडर मिळून आली:

सोहेल दिलीप खान (वय 26, रा. कोपरी): याच्याकडे 1 किलो 56 ग्रॅम एमडी सापडले.

रोहित विलास सितापुरे (वय 21, रा. उल्हासनगर): याच्याकडे 1 किलो 6 ग्रॅम एमडी सापडले.

या दोघांच्या चौकशीनंतर या गुन्ह्याच्या 'बॅकवर्ड लिंक'चा तपास करत असताना राजेश हडावले (वय 23, रा. कोपरी) याचे नाव निष्पन्न झाले आणि त्यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या तिघांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कोठडी आणि पुढील तपास

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाने 28 मार्च 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हे ड्रग्ज त्यांनी कोणाकडून आणले होते आणि ते कोणाला विकणार होते? या आंतरराज्य टोळीचे धागेदोरे कुठेपर्यंत पसरले आहेत, याचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक डुम्मलवाड करत आहेत.

यशस्वी पोलीस पथक

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाने पार पाडली. यामध्ये हवालदार गिरीष पाटील यांच्या सतर्कतेमुळे इतका मोठा साठा जप्त करणे शक्य झाले.

शेअर करा