मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Police News : नववर्षाच्या पार्ट्यांपूर्वी ठाणे पोलिसांची मोठी कारवाई!

Thane Police Latest Drug Racket Busted News : 5 कोटी 50 हजारांचा 'चरस' अमली पदार्थ जप्त; आरोपी पश्चिम बंगालचा, नेपाळ कनेक्शनचा संशय, गुन्हे अन्वेषण शाखेचे धागेदोरे!

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News

Thane Police Latest Drug Racket Busted News : 5 कोटी 50 हजारांचा 'चरस' अमली पदार्थ जप्त; आरोपी पश्चिम बंगालचा, नेपाळ कनेक्शनचा संशय, गुन्हे अन्वेषण शाखेचे धागेदोरे!

ठाणे :- डिसेंबर महिन्यात आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या विविध पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांची होणारी विक्री रोखण्यासाठी ठाणे पोलिसांच्या Thane Crime Branch गुन्हे अन्वेषण शाखेने आता कंबर कसली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून तब्बल 5 कोटी 59 हजार रुपये किमतीचा 'चरस' हा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे नेपाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. Thane Latest Crime News

साकेत-बाळकुम मार्गावरील पाडा क्रमांक दोन येथे अमली पदार्थ घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट पाचला मिळाली होती. या माहितीनुसार, युनिट पाचच्या पथकाने तातडीने सापळा रचला. त्यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती आढळून आला.

पथकाने त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे 5 किलो 50 ग्रॅम वजनाचा, आंतरराष्ट्रीय बाजारात 5 कोटी 50 हजार रुपये किमतीचा चरस हा अमली पदार्थाचा साठा आढळला. आरोपीचे नाव शनवर अन्वर अली (वय 38) असून, तो पश्चिम बंगालमधील खिद्दीरपोरे येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत शनवर अलीने हे अमली पदार्थ एका नेपाळी व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या अमली पदार्थ तस्करीचे जाळे नेपाळपर्यंत विस्तारलेले असण्याची शक्यता आहे. ठाणे पोलिसांनी आता या नेपाळी व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आणि या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी तपास तीव्र केला आहे.

शेअर करा