मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Police Mission All Out : गणेशोत्सवापूर्वी ठाण्यात 'ऑपरेशन ऑल आऊट'; 250 पोलिसांची धडक कारवाई, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

Thane Police mission All Out Latest News : 46 अधिकारी आणि 205 कर्मचारी सहभागी; 86 हजार रुपयांचा दंड वसूल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Police Mission All Out : गणेशोत्सवापूर्वी ठाण्यात 'ऑपरेशन ऑल आऊट'; 250 पोलिसांची धडक कारवाई, गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या

Thane Police mission All Out Latest News :46 अधिकारी आणि 205 कर्मचारी सहभागी; 86 हजार रुपयांचा दंड वसूल

उल्हासनगर :- गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणासुदीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलिसांकडून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. परिमंडळ चारच्या पोलिसांनी शनिवारी रात्री अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर या तिन्ही शहरांमध्ये 'ऑपरेशन ऑल आऊट' राबवून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवले आहे. या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. Thane Police Latest News

परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली, ज्यात तब्बल 250 पोलिसांचे पथक सहभागी झाले होते. यात 46 पोलिस अधिकारी आणि 205 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या मोहिमेत पोलिसांनी अनेक महत्त्वाच्या कारवाया केल्या:

  • दारूबंदी कायद्यांतर्गत 9 गुन्हे दाखल करण्यात आले.
  • अमली पदार्थांबाबत 10 गुन्हे दाखल झाले.
  • हद्दपारी केलेल्या 6 आरोपींपैकी 4 जणांना अटक करण्यात आली.
  • 153 सराईत गुन्हेगारांची कसून चौकशी करण्यात आली.
  • आर्म्स ऍक्ट अंतर्गत 3 आरोपींना अटक करण्यात आली, तर एकाला नोटीस देण्यात आली.
  • 14 ठिकाणी नाकाबंदी करून 296 वाहनांची तपासणी करण्यात आली आणि नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून 86 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
  • पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले की, "गणेशोत्सव आणि इतर सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी पोलिसांचे हे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील." गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस 24 तास सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

    शेअर करा