मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane News : भाजपची 'मार्गदर्शन शिबिरा'द्वारे चाचपणी, तर शिंदे गटाच्या बैठकीत स्वबळाचा तीव्र आग्रह

•ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत उघड नाराजी; गणेश नाईक विरुद्ध नरेश म्हस्के वाकयुद्ध कायम

V
Vivek

2 मिनिट वाचन

Thane News : भाजपची 'मार्गदर्शन शिबिरा'द्वारे चाचपणी, तर शिंदे गटाच्या बैठकीत स्वबळाचा तीव्र आग्रह

•ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत उघड नाराजी; गणेश नाईक विरुद्ध नरेश म्हस्के वाकयुद्ध कायम

ठाणे :- आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुका महायुतीतील दोन प्रमुख पक्षांसाठी म्हणजेच भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी आव्हान ठरण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वाकयुद्धामुळे दोन्ही पक्षांनी आता 'स्वबळाची' चाचपणी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

भाजपचे शिबीर, शिंदे गटात 'राडा'

भाजपची चाचपणी: ठाणे महापालिकेच्या एकूण 33 प्रभागातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी भाजपने आज (गुरुवारी) मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून भाजपने एकप्रकारे 'स्वबळावर' लढण्याची तयारी आणि इच्छुकांची चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे.

शिंदे गटाचा आग्रह याच शिबिराच्या एक दिवस आधी, ठाण्यातील आनंद आश्रम येथे खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा तीव्र आग्रह धरला.

भाजपबाबत नाराजीचा सूर

या बैठकीत भाजपबाबत उघडपणे नाराजीचा सूर उमटला. ठाण्यातील शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या विकासकामांमध्ये भाजपचे काही पदाधिकारी अडथळे आणत असल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी व्यक्त केल्या. खासदार नरेश म्हस्के यांनी मात्र यावेळी नाराज नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांनी एकत्र राहून संघटन बळकट ठेवण्याचे आवाहन केले.

नेत्यांचे वाकयुद्ध

जिल्ह्यात भाजपचे आमदार आणि नेते गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत, तर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के हे नाईकांच्या टीकेला सातत्याने प्रत्युत्तर देत आहेत.

दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी, "ठाण्याचा महापौर भाजपचा झाला पाहिजे, हीच आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि आमचीही हीच भूमिका कायम राहील," असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव अधिक वाढला आहे.

या सर्व घडामोडी पाहता, ठाणे जिल्ह्यातील पालिका निवडणुका भाजप आणि शिंदे गट महायुतीत एकत्र लढणार की, दोघेही स्वबळावर मैदानात उतरणार, याकडे आता राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा: Mumbai News : मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये गर्भवती महिलेला प्रसूती वेदना; तरुणाने डॉक्टर मैत्रिणीच्या मदतीने यशस्वी प्रसूती केली

शेअर करा