मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Latest News : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ठाण्यात 'एकता दौड'चे आयोजन; सरदार पटेलांना आदरांजली

Thane Latest News : 31 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता दौडीला प्रारंभ; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Latest News : राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ठाण्यात 'एकता दौड'चे आयोजन; सरदार पटेलांना आदरांजली

Thane Latest News : 31 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता दौडीला प्रारंभ; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

ठाणे :- भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल Sardar Vallabh Bhai Patel यांची 150 वी जयंती निमित्त संपूर्ण देशभरात 'राष्ट्रीय एकता दिवस' साजरा होत आहे. याच अनुषंगाने ठाणे शहरात दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7 वाजता ठाणे पोलीस दलाकडून 'एकता दौड' (रन फॉर युनिटी) चे आयोजन करण्यात आले आहे. देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता जपण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी ही विशेष दौड आयोजित केली जात आहे.

या राष्ट्रीय उपक्रमात ठाण्यातील सर्व नागरिकांनी, पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच सर्व पत्रकार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दौडीचा मार्ग आणि वेळ

इच्छुक नागरिकांनी दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6.45 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक, तलावपाळी, ठाणे येथे उपस्थित राहावे.

एकता दौड छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाळी येथून सुरू होईल. दौडीचा मार्ग असा असेल: मुस चौक उजवी बाजू, साईकृपा हॉटेल, गडकरी रंगायतन सर्कल उजवी बाजू, परफेक्ट ड्रायव्हिंग स्कूल, सेंटॉन हायस्कूल, चिंतामणी ज्वेलर्स चौक आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाळी येथे दौड समाप्त होईल.

शेअर करा