मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Fraud News : सांसदाच्या खोट्या सहीवर रेल्वे तिकीट घ्यायचा प्रयत्न! CSMT पोलिसांकडून फसवणूक प्रकरणी एफआयआर

Thane Latest Fraud News : देवगिरी एक्स्प्रेससाठी बनावट पत्र सादर; रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला प्रकार

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Fraud News : सांसदाच्या खोट्या सहीवर रेल्वे तिकीट घ्यायचा प्रयत्न! CSMT पोलिसांकडून फसवणूक प्रकरणी एफआयआर

Thane Latest Fraud News : देवगिरी एक्स्प्रेससाठी बनावट पत्र सादर; रेल्वे अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उघड झाला प्रकार

ठाणे,(भिवंडी) :- भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा यांच्या खोट्या सहीचा वापर करून रेल्वेच्या खासदार कोट्यातून तिकीट मिळवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे पोलिसांनी एजाज सईद या व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वेच्या अधिकाऱ्यांना 30 मे रोजी मध्य रेल्वेच्या आरक्षण विभागात देवगिरी एक्स्प्रेससाठी दोन तिकिटांची शिफारस करणारे पत्र मिळाले. हे पत्र 31 मेच्या प्रवासासाठी होते आणि त्यावर खासदार म्हात्रे यांचे नाव, सही आणि लेटरहेड वापरलेले होते. मात्र पत्राची भाषा, मांडणी आणि हस्ताक्षर पाहता अधिकाऱ्यांना शंका आली. त्यांनी थेट खासदारांचे खाजगी सहायक आकाश पाटील यांच्याशी संपर्क साधला.

पाटील यांच्या तक्रारीनंतर समोर आले की, पत्र हाताने लिहिलेले होते, जे खरे असते तर टायपिंग केलेले असते. शिवाय त्या दिवशी खासदार म्हात्रे विदेशात होते. त्यामुळे हे पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

रेल्वे पोलिसांनी त्वरित कारवाई करत एजाज सईदविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 318(4), 336(2), 336(3) आणि 340(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी यापूर्वीही अशा प्रकारात सामील होता का, याचीही चौकशी सुरू आहे. तसेच हे एखाद्या रॅकेटचा भाग तर नाही ना, याचीही सखोल तपासणी केली जात आहे.

सांसद कोट्यातून रेल्वे तिकीट मिळवण्यासाठी खास शिफारस प्रणाली आहे. परंतु या घटनेमुळे या व्यवस्थेचा गैरवापर किती सोपा आहे, हे स्पष्ट झाले असून रेल्वे प्रशासन अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

शेअर करा