मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Drugs News : 75 लाखांचे 'एमडी' ड्रग्ज जप्त, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Thane Latest Drug News : राजस्थानहून विक्रीसाठी आणलेला 501 ग्रॅम अंमली पदार्थ ठाण्यात जप्त,गुन्हे शाखा, ठाण्याची मोठी कारवाई; दोन आरोपींना अटक, तपास सुरू

V
Vivek

2 मिनिट वाचन

Thane Drugs News : 75 लाखांचे 'एमडी' ड्रग्ज जप्त, आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश

Thane Latest Drug News : राजस्थानहून विक्रीसाठी आणलेला 501 ग्रॅम अंमली पदार्थ ठाण्यात जप्त,गुन्हे शाखा, ठाण्याची मोठी कारवाई; दोन आरोपींना अटक, तपास सुरू

ठाणे : - राजस्थान राज्यातून छुप्या मार्गाने विक्रीसाठी आणलेला सुमारे 75 लाख रुपयांचा एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ ठाणे गुन्हे शाखा, घटक-1 Thane Crime Branch Unit 1 ने जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. Thane Police Latest Crime News

गुन्हे शाखा, घटक-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना 9 सप्टेंबर 2025 रोजी गुप्त माहिती मिळाली की, एक इसम राजस्थानहून एम.डी. क्रिस्टल पावडर घेऊन मुंबईकडे येत आहे. या माहितीच्या आधारे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, खारीगाव टोलनाक्याजवळ सापळा रचण्यात आला. Thane Police Latest News

सायंकाळीच्या दरम्यान, हुंडाई आय 20 (क्र. MP-09-DC-2908) ही संशयित गाडी टोलनाक्यावर येताच पोलिसांनी ती अडवली. गाडीतील आरोपी सुरेशसिंह गंगासिंह तंवर (वय 35, रा. मध्यप्रदेश) यास ताब्यात घेण्यात आले. गाडीची आणि आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याजवळ 501.50 ग्रॅम वजनाची एम.डी. क्रिस्टल पावडर आढळून आली, ज्याची बाजारात किंमत सुमारे 75 लाख 22 हजार 500 रुपये आहे. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपासात आरोपी सुरेशसिंह तंवर याने त्याचे साथीदार कुलदीपसिंह परिहार आणि अभिषेक जैस्वाल यांच्यासोबत हा अंमली पदार्थ ठाण्यात विक्रीसाठी आणल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून कुलदीपसिंह परिहार याला 12 सप्टेंबर रोजी अटक केली. हे आरोपी मूळचे मध्यप्रदेशचे असून, त्यांनी हा अंमली पदार्थ राजस्थान आणि मध्यप्रदेशच्या सीमेवरील गावांतून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे हे करत आहेत. अटक आरोपींची पोलीस कोठडी 20 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली आहे. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक दीपक घुगे, रवींद्र पाटील तसेच इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

शेअर करा