मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Crime News : ‘मास्टर की’ने ठाणे शहर गाजवणारा अट्टल चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात! करण आढाव याला अटक, 7 गुन्हे उघड

•सीसीटीव्हीच्या जाळ्याने पोलिसांचा थरारक पाठलाग यशस्वी; 2.85 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News : ‘मास्टर की’ने ठाणे शहर गाजवणारा अट्टल चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात! करण आढाव याला अटक, 7 गुन्हे उघड

•सीसीटीव्हीच्या जाळ्याने पोलिसांचा थरारक पाठलाग यशस्वी; 2.85 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ठाणे :- ‘मास्टर की’ वापरून रिक्षा आणि मोटरसायकल चोरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला ठाणे पोलिसांनी अटक करून मोठी कामगिरी बजावली आहे. या एकाच आरोपीच्या अटकेने मागील 9 महिन्यांतील तब्बल 7 वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून, 2 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही थरारक कारवाई 12 सप्टेंबर 2025 रोजी कळवा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका रिक्षा चोरीच्या गुन्ह्यानंतर सुरू झाली. गुन्हे शाखा, घटक-1 चे सहायक पोलीस उपनिरीक्षक दयानांद नाईक आणि पोलीस हवालदार संदीप महाडीक यांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करत घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीची ओळख पटवून पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. ठाणे शहरातील माजिवडा, घोडबंदर रोड येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपीचा नेमका पत्ता शोधून काढण्यात आला.

अखेर 15 सप्टेंबर 2025 रोजी पोलिसांनी करण बाळू आढाव (वय 24) या अट्टल चोराला अटक केली. पोलीस निरीक्षक विजय मोरे आणि पोलीस उपनिरीक्षक दिपक घुगे यांनी केलेल्या कसून चौकशीत आरोपीने धक्कादायक कबुली दिली. त्याने 'मास्टर की'च्या मदतीने 2 रिक्षा आणि 5 मोटरसायकलींची चोरी केल्याचे कबूल केले.

ठाणे पोलीस आयुक्तलयातील कळवा, नौपाडा, राबोडी आणि गणेशपुरी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्याने हे गुन्हे केले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली, तसेच पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली.

हेही वाचा: Maharashtra Politics : राहुल गांधींचे आरोप निराधार; निवडणूक आयोगाने दिले सोशल मीडियावरून प्रत्युत्तर

शेअर करा