मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Crime News : ठाण्यात 1 कोटी 10 लाखांचा 'चरस' जप्त! - जम्मू-काश्मीर कनेक्शन असलेल्या मोहम्मद सिद्धिकीला मुंब्रा पोलिसांकडून अटक

Thane Latest Crime News : नववर्षाच्या पार्ट्यांसाठी आणलेला चरस ऐरोली-मुंब्रा बोगद्याजवळ जप्त; आरोपी मोहम्मद सिद्धिकीविरोधात राजस्थानमध्येही गुन्हा नोंद

V
Vivek

1 मिनिट वाचन

Mumbai Crime News

Thane Latest Crime News : नववर्षाच्या पार्ट्यांसाठी आणलेला चरस ऐरोली-मुंब्रा बोगद्याजवळ जप्त; आरोपी मोहम्मद सिद्धिकीविरोधात राजस्थानमध्येही गुन्हा नोंद

ठाणे :- नववर्षाच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुंब्रा पोलिसांनी Mumbra Police मोहम्मद हारून हरसत अली सिद्धिकी (वय 42) याला अटक करून त्याच्या ताब्यातून तब्बल 1 कोटी 10 लाख 25 हजार रुपये किमतीचा चरस जप्त केला आहे. Thane Police Latest News

मुंब्रा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी शनिवारी (7 डिसेंबर) रात्री ऐरोली-मुंब्रा बोगदा भागात गस्त घालत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पदरीत्या आढळून आला. पोलिसांना पाहताच तो पळू लागल्याने पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतल्यानंतर पोलिसांना त्याच्याकडून 2 किलो 205 ग्रॅम वजनाचा चरस हा अमली पदार्थ आढळून आला. आरोपी मोहम्मद सिद्धिकी हा मुंब्रा येथे वास्तव्यास असून, त्याने हा चरसचा मोठा साठा थेट जम्मू-काश्मीरमधून आणल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. त्याच्याविरोधात राजस्थान येथील पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हा जप्त केलेला चरसचा साठा तो ठाण्यातील कोणत्या पार्टी आयोजकांना किंवा तस्करांना विकणार होता, याबद्दल सखोल तपास सुरू असून, पोलिसांनी त्याच्या जम्मू-काश्मीरमधील 'कनेक्शन'चा शोध सुरू केला आहे.

शेअर करा