मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thane Breaking News : ठाण्यात आज ठाकरे बंधू एकत्र येणार? मनसे आणि शिवसेना नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेकडे लक्ष

Rajan Vichare And Avinash Jadhav : मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलणार?

V
Vivek

1 मिनिट वाचन

Uddhav Thackeray: Uddhav Thackeray's first reaction to Raj Thackeray's statement: 'There was no conflict from me, but...'

Rajan Vichare And Avinash Jadhav : मुंबई-ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलणार? 'ठाकरे ब्रँड' टिकवण्याची कार्यकर्त्यांची मागणी ; राजन विचारे आणि अविनाश जाधव घेणार एकत्रित पत्रकार परिषद; युतीची घोषणा होण्याची शक्यता

ठाणे :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी ठाकरे बंधू (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र येणार का, या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. 'ठाकरे ब्रँड' टिकवून ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवावी, अशी मागणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर, काल (गुरुवार) ठाणे शहरात मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे Rajan Vichare आणि मनसेचे नेते अविनाश जाधव Avinash Jadhav हे एकत्रित पत्रकार परिषद घेणार आहेत. पहिल्यांदाच ही पत्रकार परिषद एकत्रितरित्या होत असल्याने यातून दोन्ही पक्षाचे नेते काय भूमिका मांडणार, युतीची घोषणा होणार की केवळ स्थानिक प्रश्नांवर एकत्र येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बदललेली समीकरणे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर मुंबई, ठाणे, नाशिकसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये शिवसेनेची दोन शकले पडली आहेत. विशेषतः मुंबई आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांवर शिवसेनेची सत्ता होती आणि ठाण्यातूनच शिवसेनेची सत्ता पहिल्यांदा आली होती. त्यामुळे या दोन्ही महापालिका शिवसेनेसाठी महत्त्वाच्या आहेत.

शिवसेनेची झालेली दोन शकले आणि भाजपची वाढती आक्रमकता पाहता, मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने एकत्र यावे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते करत आहेत.

महाविकास आघाडीच्या बैठकांचे सत्र

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील राजकारण तापले असून, महाविकास आघाडीतील ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेत्यांमध्ये सातत्याने बैठका होत आहेत. काही दिवसांपूर्वीच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली होती. या बैठकीत राजन विचारे, अविनाश जाधव आणि काँग्रेसचे विक्रांत चव्हाण उपस्थित होते. या बैठकांमधूनच आजच्या संयुक्त पत्रकार परिषदेची पार्श्वभूमी तयार झाल्याचे मानले जात आहे.

शेअर करा