मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thackeray Group : मुंबई मनपात पुन्हा भगवा फडकवण्याची 'ठाकरे' मोहीम तेजीत!

Thackeray Group On BMC On Election : उपनेत्यांना विभागनिहाय जबाबदाऱ्या; संघटनात्मक हालचालींना वेग,निवडणूकपूर्व मोर्चेबांधणीने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thackeray Group On BMC On Election : उपनेत्यांना विभागनिहाय जबाबदाऱ्या; संघटनात्मक हालचालींना वेग,निवडणूकपूर्व मोर्चेबांधणीने शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य

मुंबई | मुंबई महानगरपालिकेवर Mumbai BMC पुन्हा एकदा आपला भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. आगामी काही महिन्यांत होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी ठाकरे गटाने आताच संघटनात्मक मोर्चेबांधणीला वेग दिला आहे.

मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेचा प्रतिष्ठेचा गड! तब्बल 25 वर्षांपासून या संस्थेवर सेनेचे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी पक्षाकडून रणनीती आखली जात असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षातील प्रमुख उपनेत्यांना विशिष्ट विधानसभा मतदारसंघांवर जबाबदारी सोपवून मैदानात उतरवले जात आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदाऱ्या नेमून दिल्या आहेत. यात अमोल कीर्तीकर (दहिसर- मागाठाणे), उद्धव कदम (चारकोप- मालाड), विश्वासराव नेरूरकर (वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम), रवींद्र मिर्लेकर (विलेपार्ले- वांद्रे), नितीन नांदगावकर (मुलुंड- विक्रोळी), सचिन अहिर (मलबार हिल- मुंबादेवी) गुरुनाथ खोत (चांदिवली, कलीना, कुर्ला),सुबोध आचार्य (घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर - मानखुर्द), मनोज जमसूतकर (अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा ), अरुण दूधवडकर (धारावी, माहीम, वडाळा),अशोक धात्रक (वरळी, दादर, शिवडी ),विलास पोतनीस (दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व) आदींचा समावेश आहे.

या जबाबदाऱ्या केवळ निवडणुकीपुरत्या नसून, शाखा पातळीवरील संघटनबांधणी, जनसंपर्क, आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक उपनेत्याला तीन विधानसभा क्षेत्रांची जबाबदारी दिल्याने त्यांच्यावर मोठे दायित्व आले आहे.

शेअर करा