मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Thackeray Dasara Melava : 'शिवाजी पार्क'वर पुन्हा ठाकरेंचाच 'आवाज'! उद्धव गटाला दसरा मेळाव्याची परवानगी

Thackeray Dasara Melava Latest News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मेळावा; उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thackeray Dasara Melava : 'शिवाजी पार्क'वर पुन्हा ठाकरेंचाच 'आवाज'! उद्धव गटाला दसरा मेळाव्याची परवानगी

Thackeray Dasara Melava Latest News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मेळावा; उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे लक्ष

मुंबई :- शिवसेनेची ओळख असलेल्या शिवाजी पार्कवर यंदाही उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळाली आहे. दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवर दाखल होण्यास उत्सुक आहेत. विशेष म्हणजे, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होत असल्यामुळे उद्धव ठाकरे यातून कोणती भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिंदे-ठाकरे यांच्यातील रस्सीखेच

शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्क हे दसरा मेळाव्याचे मुख्य केंद्र राहिले आहे. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून या मैदानासाठी शिंदे आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू होती. यंदा मात्र हा वाद जास्त न वाढवता, हे मैदान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आले आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे.

राज ठाकरेंच्या भेटीनंतर चर्चांना उधाण; दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येणार का?

दरम्यान, दसरा मेळाव्याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट तब्बल सव्वादोन तास चालली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या भेटीत दोन्ही नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर चर्चा केल्याचे समजते.

या भेटीत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी निमंत्रण दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे, आगामी दसरा मेळाव्यामध्ये राज ठाकरे उपस्थित राहणार का? आणि शिवसेना-मनसेमध्ये युती होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

येत्या 2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या दसरा मेळाव्याकडे आता केवळ शिवसैनिकच नव्हे, तर मनसैनिक आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे भाषणातून काय 'डरकाळी फोडणार' आणि राज ठाकरे त्यात सामील होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शेअर करा