मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

शिक्षक संघटनांचा एल्गार! - 'वेतन कपात करा, पण माघार नाही'; 5 डिसेंबरला 25 हजार शाळा बंद राहणारच

Teacher Strike On 5 December : संचमान्यता, समायोजन आणि टीईटीच्या निर्णयाविरोधात आंदोलन; संघटनांची ठाम भूमिका, 'एक दिवसाच्या कपातीने फरक पडणार नाही'

V
Vivek

1 मिनिट वाचन

शिक्षक संघटनांचा एल्गार! - 'वेतन कपात करा, पण माघार नाही'; 5 डिसेंबरला 25 हजार शाळा बंद राहणारच

Teacher Strike On 5 December : संचमान्यता, समायोजन आणि टीईटीच्या निर्णयाविरोधात आंदोलन; संघटनांची ठाम भूमिका, 'एक दिवसाच्या कपातीने फरक पडणार नाही'

मुंबई :- शिक्षण विभागाने एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेऊनही राज्यातील शिक्षक संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत येत्या 5 डिसेंबर रोजी राज्यभरातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित अशा जवळपास 25 हजार शाळा बंद ठेवण्याचा ठाम निर्धार शिक्षक संघटनांनी व्यक्त केला आहे.

वेतन कपातीला जुमानले नाही

विविध मागण्यांसाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 'शाळा बंद' आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने घेतला. मात्र, या निर्णयामुळे शिक्षक संघटनांनी अधिक तीव्र भूमिका घेतली आहे.
अनिल बोरनारे (मुंबई मराठी अध्यापक संघ): "शिक्षकांच्या समायोजनामुळे नववी आणि दहावीच्या जवळपास 18 हजार शाळा बंद पडणार आहेत. विद्यार्थ्यांचे आयुष्यही उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे एक दिवसाचे काय, महिनाभराचे वेतन कपात केले तरी चालेल, पण आता माघार नाही, आंदोलन होणारच."

जालिंदर सरोदे (शिक्षक सेना राज्य कार्याध्यक्ष): "संचमान्यतेमुळे ग्रामीण भागासह राज्यातील 25 हजार शाळा बंद होणार आहेत. सरकार कोणतीही ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करता 5 डिसेंबरला राज्यभरात शाळा बंद ठेवणार."

'गळचेपी'वर संताप

मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे मुख्य नेते डॉ. विशाल कडणे यांनी सरकारकडून होणाऱ्या आंदोलनाच्या गळचेपीवर संताप व्यक्त केला. "शिक्षकांचे आयुष्य पणाला लागलेले असताना अशा प्रकारे आंदोलन दडपण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी शिक्षक मागे हटणार नाहीत. वेतन कपात केल्यास त्याचे पडसाद महानगरपालिका निवडणुकीमध्ये दिसतील," असा इशारा त्यांनी दिला.
महामुंबई शिक्षक संस्था संघटनेचे अध्यक्ष सदानंद रावराणे यांनीही या आंदोलनाला संस्थाचालक संघटनेमार्फत पाठिंबा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, एक दिवसाच्या वेतनाने शिक्षकांच्या हक्कावर वरवंटा फिरवला जाणार असल्याने ते माघार घेणार नाहीत.

शेअर करा