मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pimpari News : अन्न व औषध प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या तळवडेतील दोन डॉक्टरांवर गुन्हा

Pimpari News :पिंपरी: तळवडे येथील मेडिकल शॉपचा परवाना मिळविण्यासाठी बनावट सह्या व खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केली.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

अन्न व औषध प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या तळवडेतील दोन डॉक्टरांवर गुन्हा संशयितांनी भारती एक्सा लाईफ चिंचवड शाखेकडून घेतले कर्ज
अन्न व औषध प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या तळवडेतील दोन डॉक्टरांवर गुन्हा संशयितांनी भारती एक्सा लाईफ चिंचवड शाखेकडून घेतले कर्ज

Pimpari News : संशयितांनी भारती एक्सा लाईफ चिंचवड शाखेकडून घेतले कर्ज

Pimpari News :पिंपरी: तळवडे येथील मेडिकल शॉपचा परवाना मिळविण्यासाठी बनावट सह्या व खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी दोन डॉक्‍टरांवर गुन्‍हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ ऑक्टोबर २०२३ पासून मोशी येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात घडला.https://maharashtramirror.com/ Pimpari News

डॉ. प्रशांत मधुकर पाटील-कांबळे (३४, रा. चिखली) आणि डॉ. रविकांत अशोक हडपद-चिंचवडे (३५, रा. चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संजय मोहन सिंग राठोड (५४, रा. मोशी) यांनी १७ सप्‍टेंबर रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pimpari news

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे मेडिकल शॉप नावाने दुकान आहे. या मेडिकलच्या परवान्याबाबत आरोपींनी भागीदारीतील परवाना रद्द करण्यासाठी अर्जावर व संमती पत्रावर बनावट सह्या केल्या. ते दस्तावेज खरे असल्याचे भासवून कार्यालयाकडून परवाना रद्द करून स्वतःच्या नावे केला. तसेच आरोपी रविकांत याने परवाना फॉर्म नंबर-२० मध्ये परस्पर बदल करून दुसऱ्याचे नाव वगळले व एकाच्याच नावावर परवाना करून भारती एक्सा लाईफ चिंचवड शाखेकडून कर्ज घेतले. तसेच दोघांनीही शासनाची फसवणूक केली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा