Pimpari News : अन्न व औषध प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या तळवडेतील दोन डॉक्टरांवर गुन्हा
Pimpari News :पिंपरी: तळवडे येथील मेडिकल शॉपचा परवाना मिळविण्यासाठी बनावट सह्या व खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केली.
1 મિનિટ વાંચન

Pimpari News : संशयितांनी भारती एक्सा लाईफ चिंचवड शाखेकडून घेतले कर्ज
Pimpari News :पिंपरी: तळवडे येथील मेडिकल शॉपचा परवाना मिळविण्यासाठी बनावट सह्या व खोटी कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १२ ऑक्टोबर २०२३ पासून मोशी येथील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात घडला.https://maharashtramirror.com/ Pimpari News
डॉ. प्रशांत मधुकर पाटील-कांबळे (३४, रा. चिखली) आणि डॉ. रविकांत अशोक हडपद-चिंचवडे (३५, रा. चिंचवड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी संजय मोहन सिंग राठोड (५४, रा. मोशी) यांनी १७ सप्टेंबर रोजी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.https://maharashtramirror.com/ Pimpari news
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे मेडिकल शॉप नावाने दुकान आहे. या मेडिकलच्या परवान्याबाबत आरोपींनी भागीदारीतील परवाना रद्द करण्यासाठी अर्जावर व संमती पत्रावर बनावट सह्या केल्या. ते दस्तावेज खरे असल्याचे भासवून कार्यालयाकडून परवाना रद्द करून स्वतःच्या नावे केला. तसेच आरोपी रविकांत याने परवाना फॉर्म नंबर-२० मध्ये परस्पर बदल करून दुसऱ्याचे नाव वगळले व एकाच्याच नावावर परवाना करून भारती एक्सा लाईफ चिंचवड शाखेकडून कर्ज घेतले. तसेच दोघांनीही शासनाची फसवणूक केली. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
