मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Taloja Police News : गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश! — 'हिस्ट्रीशीटर' इम्तियाज शेख व टोळीवर तळोजा पोलिसांचा धडाकेबाज गुन्हा"

Taloja Police Arrested Imteaj Shaikh Gang : बांधकाम साईटवरून लाखोंच्या लोखंडी सळ्यांची चोरी; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

V
Vivek

1 मिनिट वाचन

Thane Crime News

Taloja Police Arrested Imteaj Shaikh Gang : बांधकाम साईटवरून लाखोंच्या लोखंडी सळ्यांची चोरी; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तळोजा :- तळोजा परिसरात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळीचा धुमाकूळ! गुन्हेगारी इतिहास असलेल्या इम्तियाज ख्वाजा शेख व त्याच्या नऊ साथीदारांनी बांधकाम साईटवरून लाखोंच्या लोखंडी सळ्या चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळोजा पोलीस ठाण्याने Taloja Police Station या सर्वांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईमुळे गुन्हेगारांच्या जाळ्यावर पोलिसांनी घातलेली ही मोठी गदा मानली जात आहे. संशयितांमध्ये ओमप्रकाश चौधरी, मेहफूज अहमद खान, निजाम अली, रूद्रप्रसाद चौधरी, जलालुद्दीन खान, संतोष गौतम, मशुकअली अन्सारी आणि मोहम्मद अली यांचा समावेश आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या महागड्या लोखंडी सळ्या बेकायदेशीररित्या हस्तगत केल्या. त्यानंतर त्या चोरी करण्यात आल्या. सदर गुन्ह्याचा तपास सध्या तळोजा पोलिसांकडून गुप्त पद्धतीने सुरू आहे.

'हिस्ट्रीशीटर' इम्तियाज शेखचा मोबाईल नंबरही पोलिसांकडे असून (+91 907645927), या टोळीने याआधीही अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.स्थानिक बांधकाम व्यावसायिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून अधिक माहिती लवकरच जाहीर होणार असल्याचे समजते.

शेअर करा