मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Talathi Recruitment : तलाठी परीक्षा संदर्भात एसआयटी नेमणूक करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे

•विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

V
Vivek

1 मिनिट वाचन

Talathi Recruitment : तलाठी परीक्षा संदर्भात एसआयटी नेमणूक करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे

•विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

मुंबई :- राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प अधिवेशन सध्या चालू आहे. या अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला घेरण्याकरिता विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकार विरुद्ध घोषणाबाजी देत आंदोलन केले जात आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विरोधकांनी तलाठी भरती संदर्भात एसआयटी नेमणूक करावी अशी मागणी करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. Talathi Recruitment

"परीक्षार्थी त्रस्त सरकार मस्त..", "प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे सरकारचा धिक्कार असो…"अशा घोषणा विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर देण्यात आल्या यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे नेते आमदार बंटी पाटील, सचिन अहिर यांच्याकडून घोषणा देण्यात आली आहे. Talathi Recruitment

तलाठी भरतीत महाघोटाळा झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले होते. परंतु त्यांनी कोणतेही ठोस पुरावे न देता बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर याप्रकरणी महसूल विभागामार्फत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पुरावे न दिल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता. यावरुन आता महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. राज्यातील सर्व परीक्षा घोटाळ्यांवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत महाविकास आघाडीच्या वतीने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. Talathi Recruitment

शेअर करा