मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sushma Andhare : गडकरींच्या कुकर्मांची पोलखोल करणार’; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा थेट इशारा

Sushma Anadhare On Nitin Gadkari : दोन दिवसांपूर्वीच सुषमा अंधारे यांनी केले होते भाकीत, पतीच्या 'मित्रा' संस्थेतील नियुक्तीवरही वाद

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sushma Andhare : गडकरींच्या कुकर्मांची पोलखोल करणार’; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा थेट इशारा

Sushma Anadhare On Nitin Gadkari : दोन दिवसांपूर्वीच सुषमा अंधारे यांनी केले होते भाकीत, पतीच्या 'मित्रा' संस्थेतील नियुक्तीवरही वाद

मुंबई :- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. गडकरी यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची ‘पोलखोल’ करणार असल्याचा इशारा दमानियांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे दिला आहे. या घोषणेमुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दोनच दिवसांपूर्वी दमानियांचे पुढील लक्ष्य नितीन गडकरी असतील, असे भाकीत केले होते, जे खरे ठरले आहे.

दमानिया काय म्हणाल्या?

अंजली दमानिया यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. “उद्या दुपारपासून मी नितीन गडकरी यांच्याविरुद्ध पोलखोल करायला सुरुवात करणार आहे. त्यांच्या सगळ्या कुकर्मांची पूर्ण मालिकाच सुरू करणार आहे,” असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. दमानिया यांच्या या भूमिकेमुळे आता गडकरींवर नेमके कोणते आरोप होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुषमा अंधारेंचे भाकीत खरे

दमानियांच्या या भूषिकेवर सुषमा अंधारे यांनी दोनच दिवसांपूर्वी भाष्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या की, “दमानिया भाजप वगळून इतर सर्वांची प्रकरणे हाती घेतात. परंतु, नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नितीन गडकरी नको आहेत. त्यामुळे दमानियांचे पुढचे टार्गेट गडकरी असल्यास नवल वाटणार नाही.” अंधारे यांचे हे भाकीत आता खरे ठरल्याचे दिसून येत आहे.

पतीच्या नियुक्तीवरूनही वाद

काही दिवसांपूर्वीच अंजली दमानिया यांचे पती अनीश दमानिया यांची राज्य सरकारच्या थिंक टँक 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी दमानियांवर खोचक टीका केली होती. या टीकेवर दमानियांनी उत्तर दिले होते की, “मी सध्या एका खूप मोठ्या प्रकरणावर काम करत आहे. त्यामुळे रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी एक आठवडा थांबावे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण माझ्याकडे सध्या वेळ कमी आहे.” या विधानावरूनच दमानिया गडकरींसारख्या मोठ्या नेत्यावर कारवाई करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

शेअर करा