मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Supriya Sule : "संसदेत कान उघडे ठेवा, अभ्यासू बोला!" पहिल्यांदाच राज्यसभा गाठणाऱ्या पार्थ पवारांना आत्या सुप्रिया सुळेंचा मोलाचा 'कानमंत्र'

Supriya Sule On Parth Pawar : पार्थ पवारांना संसदेतील 'वावरण्याचा' खास कानमंत्र "बारामतीमुळे ही संधी मिळाली, हे कायम लक्षात ठेव!"

V
Vivek

2 मिनिट वाचन

Supriya Sule

Supriya Sule On Parth Pawar : पार्थ पवारांना संसदेतील 'वावरण्याचा' खास कानमंत्र "बारामतीमुळे ही संधी मिळाली, हे कायम लक्षात ठेव!"

मुंबई :- महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. निमित्त होते राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार Parth Pawar यांच्या उमेदवारी अर्ज सादरीकरणाचे. विधानभवनात दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठी गर्दी केली असतानाच, खासदार सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांना 'आत्या' आणि एक 'अनुभवी खासदार' म्हणून संसदेतील वावरण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला. संसदेच्या पायऱ्या चढताना स्वतः शरद पवारांनी आपल्याला दिलेला वारसा आणि संस्कारांची आठवण करून देत सुप्रिया सुळे यांनी पार्थच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संसदेची पायरी चढताना शरद पवारांच्या 'त्या' शब्दांची आठवण

सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या राजकीय प्रवासातील पहिल्या दिवसाची आठवण यावेळी जागी केली. त्या म्हणाल्या की, जेव्हा त्या पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आणि लोकसभेची पायरी चढत होत्या, तेव्हा शरद पवारांनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला होता. "बारामती मतदारसंघामुळे ही पायरी चढण्याची संधी मिळाली आहे, हे कायम लक्षात ठेव," असे पवार साहेबांनी सांगितले होते. याच भावनेशी प्रामाणिक राहून संसदेत काम करण्याची जबाबदारी आता पार्थवर आहे, असे सुळे यांनी आवर्जून नमूद केले.

पार्थ पवारांना संसदेतील 'वावरण्याचा' कानमंत्र

पहिल्यांदाच वरिष्ठ सभागृहात पाऊल ठेवणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांनी अत्यंत नेमका सल्ला दिला. "लोकसभा आणि राज्यसभेत नेहमी कान उघडे ठेवायचे, सुरुवातीला कमी बोलायचे आणि जेव्हा कधी बोलण्याची संधी मिळेल, तेव्हा ती पूर्ण अभ्यासाने आणि तयारीने मांडायची," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सभागृहात बसलेले सदस्य खूप जाणकार असतात आणि संपूर्ण देश आपल्याकडे पाहत असतो, त्यामुळे तिथली प्रत्येक कृती ही जबाबदारीची असली पाहिजे, याची जाणीव त्यांनी पार्थ यांना करून दिली.

अजितदादांच्या अपघाती मृत्यूच्या पारदर्शक तपासाचा पुनरुच्चार

या भावनिक वातावरणात सुप्रिया सुळे यांनी दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या तपासाचा विषयही पुन्हा एकदा लावून धरला. अजितदादांच्या मृत्यूचा तपास अत्यंत पारदर्शक पद्धतीने व्हावा, अशी केवळ कुटुंबाचीच नाही तर राज्यातील प्रत्येक नागरिकाची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. रोहित पवार, जय आणि पार्थ यांच्यासह राज्यातील जनतेची हीच मागणी असून, या प्रकरणातील सत्य समोर यावे, अशी भूमिका त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.

शेअर करा