मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sunil Shukla : उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे"! 'मातोश्री' बाहेर वादग्रस्त बॅनर

Sunil Shukla Banner : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत भाषेच्या वादाचा भडका; 'उत्तर भारतीय सेना' प्रमुख सुनील शुक्ला चर्चेत

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sunil Shukla : उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे"! 'मातोश्री' बाहेर वादग्रस्त बॅनर

Sunil Shukla Banner : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत भाषेच्या वादाचा भडका; 'उत्तर भारतीय सेना' प्रमुख सुनील शुक्ला चर्चेत

मुंबई :- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापले असतानाच, मुंबईत पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरून मोठा वाद उफाळून आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या निवासस्थान 'मातोश्री' बाहेर लावण्यात आलेल्या अत्यंत वादग्रस्त पोस्टरमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बॅनरवरील धमकीवजा इशारा

उत्तर भारतीय सेना या संघटनेच्या वतीने लावण्यात आलेल्या या बॅनरमध्ये "उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे" असा थेट धमकीवजा इशारा देण्यात आला आहे. या बॅनरवरील मजकूर आणि भाषेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

बॅनर मुंबईतील शिवसेना भवन, शिवाजी पार्क, आणि मातोश्री यांसारख्या ठाकरे गटाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये लावण्यात आले आहेत.

या बॅनरवर उत्तर भारतीयांना 'सावधान' असा मोठा इशारा देण्यात आला आहे.

"महाराष्ट्र से बिहार तक, राजस्थान से यूपी तक" असाही यात उल्लेख आहे.

बॅनरच्या खाली 'उत्तर भारतीय सेना' असे लिहिले असून, संघटनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचा फोटोही छापण्यात आला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर राजकारण पेटणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्यामुळे मुंबई-ठाण्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या उत्तर भारतीय मतदारांवर पकड मजबूत करण्याची धडपड सुरू आहे. उत्तर भारतीय मतदारांना एकत्र ठेवण्याच्या उद्देशाने हे पोस्टर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आले असले तरी, त्यातील आक्रमक भाषा शहरात तणाव निर्माण करण्याची शक्यता वाढवते.

सुनील शुक्ला यांची आक्रमक भूमिका

'उत्तर भारतीय सेना'चे अध्यक्ष सुनील शुक्ला गेल्या काही महिन्यांपासून उत्तर भारतीय समाजाच्या हक्कांसाठी आक्रमक भूमिका घेत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यांवर त्यांनी अनेकदा आक्षेप घेतला आहे. मात्र, आता थेट मातोश्रीसमोरच हे वादग्रस्त बॅनर लागल्याने मुंबई पोलिसांपुढे कायदा आणि सुव्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. शहरात प्रादेशिक भावना भडकवणाऱ्या अशा पोस्टरवर पोलीस कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा