मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात

Sunetra Pawar In RSS Meeting : उपस्थितीवरून राजकीय वर्तुळात चर्चा; सुनेत्रा पवार यांनी दिले स्पष्टीकरण

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी खासदार सुनेत्रा पवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात

Sunetra Pawar In RSS Meeting : उपस्थितीवरून राजकीय वर्तुळात चर्चा; सुनेत्रा पवार यांनी दिले स्पष्टीकरण

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात हजेरी लावल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या कार्यक्रमाचा फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनीही यावर खोचक टोला लगावला आहे.

रोहित पवार यांनी अजित पवारांच्या उपस्थितीवर निशाणा साधताना म्हटले की, "जेव्हा ओबीसी आरक्षण दिले गेले होते, तेव्हा कमंडल यात्रा काय होती, हे त्यांनी आरएसएसच्या प्रमुखांना विचारायला हवे होते." तसेच, अजित पवारांवर काहीतरी दबाव असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.

या टीकेनंतर खासदार सुनेत्रा पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटले की, "माझ्या एका मीटिंगमधील उपस्थितीबाबत जी चर्चा सुरू आहे, त्याबाबत मी स्पष्टीकरण देऊ इच्छिते की त्यामागे कोणताही राजकीय उद्देश नव्हता. यात इतर महिला खासदारही सहभागी झाल्या होत्या."

त्या पुढे म्हणाल्या, "राज्यसभेच्या खासदार म्हणून आणि बारामतीमध्ये दीर्घकाळ सामाजिक कार्य करत असल्यामुळे मला विविध महिला संघटनांच्या कामाची माहिती घेण्याची उत्सुकता असते. त्या बैठकीत विविध राज्यांतील महिला सहभागी होत्या. त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठीच मी तिथे गेले होते. त्यावेळी मला बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्दांत माझी भूमिका मांडली. कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये."

सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की, "समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता, आहे आणि राहील." यामुळे राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

शेअर करा