मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Sudhir Mungantiwar : "मला कोणाच्या ताकदीची गरज नाही!" मुनगंटीवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला; चंद्रपूरच्या पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत 'खदखद' चव्हाट्यावर

•"जिल्ह्यात जाणीवपूर्वक गटबाजी पोसली; सरसंघचालकांविरुद्ध पत्र लिहिणाऱ्यांना पक्षात घेता?"; मुनगंटीवारांचा पक्षालाच 'घरचा आहेर'

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sudhir Mungantiwar : "मला कोणाच्या ताकदीची गरज नाही!" मुनगंटीवारांचा फडणवीसांना सणसणीत टोला; चंद्रपूरच्या पराभवानंतर भाजपमधील अंतर्गत 'खदखद' चव्हाट्यावर

•"जिल्ह्यात जाणीवपूर्वक गटबाजी पोसली; सरसंघचालकांविरुद्ध पत्र लिहिणाऱ्यांना पक्षात घेता?"; मुनगंटीवारांचा पक्षालाच 'घरचा आहेर'

चंद्रपूर/नागपूर | नगरपरिषद निवडणुकीच्या निकालात संपूर्ण राज्यात भाजपने मुसंडी मारली असली, तरी चंद्रपूर जिल्ह्यात मात्र काँग्रेसने भाजपचा अक्षरशः धुव्वा उडवला आहे. या पराभवानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला आहे. "चंद्रपूरमध्ये मुनगंटीवारांची ताकद कमी पडली असेल तर आम्ही त्यांना बळ देऊ," असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. "मी ताकद नसतानाही काम करणारा कार्यकर्ता आहे, मला कोणाच्या ताकदीची गरज नाही," असे सांगत त्यांनी फडणवीसांचे विधान फेटाळून लावले.

पक्षांतर्गत गटबाजीवर ओढले ताशेरे

मुनगंटीवार यांनी पराभवाचे खापर पक्षातील अंतर्गत गटबाजीवर फोडले आहे. "जिल्ह्यामध्ये गटबाजीला पोषक वातावरण निर्माण केले गेले. ज्या लोकांनी सरसंघचालकांचा कार्यक्रम रद्द व्हावा म्हणून पत्र दिले होते, अशा लोकांना तुम्ही पक्षात प्रवेश देता? ज्यांनी आयुष्यभर पक्षासाठी कष्ट केले, त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वानेच केला," असा घणाघाती आरोप त्यांनी केला. काँग्रेसने आपल्या नेत्यांना बळ दिले, मात्र भाजपने आपल्याच नेत्यांचे पंख छाटल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप

भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चारही जिल्ह्यांनी नेहमीच भाजपला साथ दिली आहे. मात्र, इतकी वर्षे सत्ता असूनही या भागात विकासाचा वेग मंदावला आहे. "छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय वेगाने होत नाहीत, त्याचा परिणाम निकालात दिसून आला. या चार जिल्ह्यांमधून एकालाही मंत्रीपद दिले गेले नाही, यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे," असे सांगत मुनगंटीवारांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली.

राज्यभर दौऱ्याची घोषणा

आगामी महानगरपालिका निवडणुकीनंतर आपण शांत बसणार नसल्याचे मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. "महापालिका निवडणुका संपल्यावर मी संपूर्ण राज्याचा दौरा करणार आहे. भाजपमध्ये कोणीही नाराज राहू शकत नाही, त्यामुळे मी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या भेटी घेणार आहे," असे त्यांनी सांगितले. 15 जानेवारीला होणाऱ्या चंद्रपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवारांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा: जेजुरीत विजयाचा जल्लोष ठरला जीवघेणा! भंडाऱ्याचा भडाका उडून नवनिर्वाचित नगरसेवकांसह अनेकजण होरपळले

शेअर करा