मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या: जितेंद्र डुडी

पुणे: जिल्ह्यात “गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार” अभियानांतर्गत धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती देण्यासाठी जलसंधारण, जलसंपदा , लघु पाटबंधारे जि.प.

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती द्या: जितेंद्र डुडी

पुणे: जिल्ह्यात “गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार” अभियानांतर्गत धरणे व तलावांमधील गाळ काढण्याच्या कामांना गती देण्यासाठी जलसंधारण, जलसंपदा , लघु पाटबंधारे जि.प. विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना समन्वयाने आवश्यक कार्यवाही करावी. याबाबतची अधिकाधिकची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सूचना दिल्या आहेत.

अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांनी त्यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना पाठविलेल्या पत्रानुसार, संबंधित धरणांमधील गाळ काढण्यासाठी अंदाजपत्रके तयार करून सविस्तर प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी कार्यालयास सादर करावेत. तसेच जलसंपदा विभागाच्या नियामक मंडळाची आवश्यक मान्यता घेण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, जलसंपदा विभागाकडून आवश्यक परवानगी प्रक्रियेस काही कालावधी लागत असल्यास त्या कालावधीत जिल्ह्यातील अतिशोषित, संकटग्रस्त,अर्धसंकटग्रस्त तसेच टँकरग्रस्त गावांमध्ये गाळ काढण्याचे, जलसंधारण व दुरुस्तीची अधिकाधिक कामांबाबत नियोजन करून ती प्राधान्याने घ्याव्यात.

यामध्ये विशेषतः भूजल पुनर्भरण क्षमता असलेल्या कामांना प्राधान्य देऊन जलसंधारण संरचनांची दुरुस्ती, गाळ उपसा व पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या कामांवर भर देण्यात येणार आहे. या अभियानामुळे पाणीटंचाई कमी होण्यास, भूजल पातळी वाढण्यास तसेच शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होण्यास मदत होईल, असेही श्री. डुडी म्हणाले.

पुणे न्युज

शेअर करा