मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

दगडूशेठ गणपती मंदिरावर अंगारकीनिमित्त 'दाक्षिणात्य' पुष्पआरास

फुलांमध्ये विविध देवतांच्या प्रतिमा ; देशी फुलांनी सजले मंदिर

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

दगडूशेठ गणपती मंदिरावर अंगारकीनिमित्त 'दाक्षिणात्य' पुष्पआरास

फुलांमध्ये विविध देवतांच्या प्रतिमा ; देशी फुलांनी सजले मंदिर

निलेश राऊत
पुणे: अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'दाक्षिणात्य' पद्धतीची पुष्पआरास करण्यात आली. मंदिराच्या पायथ्यापासून ते कळसापर्यंत विविधरंगी फुलांनी मंदिर सजले. कळसावरील फुलांमध्ये विविध देवतांच्या प्रतिमा देखील साकारण्यात आल्या. चतुर्थीनिमित्त भाविकांनी पहाटेपासून गणरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर सकाळच्या व दुपारच्या सत्रात गणेशयागाचे देखील आयोजन करण्यात आले होते.

मंदिराच्या पुढच्या बाजूला फुलांमध्ये गजराजाच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. तसेच पुष्प सजावटीकरिता यंदा देशी फुलांचा वापर करण्यात आला. यामध्ये झेंडू, शेवंती या फुलांचा प्रामुख्याने समावेश होता, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली.

शेअर करा