मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Solapur Earthquake News : राज्यात भूकंपाचे धक्के, लोकांमध्ये घबराट, जाणून घ्या किती होती तिव्रता?

Solapur Latest Earthquakes News : गुरुवारी (3 एप्रिल) सोलापुरात 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.

V
Vivek

1 मिनिट वाचन

Solapur Earthquake News : राज्यात भूकंपाचे धक्के, लोकांमध्ये घबराट, जाणून घ्या किती होती तिव्रता?

Solapur Latest Earthquakes News : गुरुवारी (3 एप्रिल) सोलापुरात 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सकाळी 11.22 वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू सोलापूर होता.

सोलापूर :- सोलापुरात गुरुवारी (3 एप्रिल) रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. Solapur Earthquake News नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने माहिती दिली आहे की सोलापुरात 3 एप्रिल रोजी सकाळी 11.22 वाजता पृथ्वी हादरली. भूकंपाची तीव्रता 2.6 रिश्टर स्केल होती. म्हणजेच सुदैवाने हे धक्के सौम्य होते.

याआधी मंगळवारी (1 एप्रिल) भारताच्या पूर्वेकडील कोलकाता आणि इंफाळमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याच वेळी, नेपाळमध्ये 28 मार्च रोजी झालेल्या भूकंपाचे धक्के बिहार, सिलीगुडी आणि भारताच्या इतर आसपासच्या भागातही जाणवले. 2 एप्रिलला सिक्कीमच्या नामचीमध्ये आणि त्याआधी 1 एप्रिलला लेह लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. 31 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशच्या तवांग आणि शी योमी आणि सिक्कीमच्या गंगटोकमध्ये भूकंप झाला होता. 30 आणि 31 मार्चला सलग दोन दिवस गंगटोकला भूकंपाचा धक्का बसला होता.

29 मार्च रोजी हरियाणातील सोनीपतमध्ये भूकंपाचा धक्का बसला. 29 मार्च रोजी दुपारी 2:08 वाजता 2.3 तीव्रतेने पृथ्वी हादरली. भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किलोमीटर खाली होता.

शेअर करा