मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Social News : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षांतच ऐतिहासिक भिडे वाड्याचे काम पूर्ण करा

पुणे, महाराष्ट्र मिरर Social News: बुधवार पेठेतील ऐतिहासिक भिडे वाडा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पाहणी करण्यात आली.

VZ
vidula zagade

1 मिनिट वाचन

Social News : महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षांतच ऐतिहासिक भिडे वाड्याचे काम पूर्ण करा

उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून कामाची पाहणी

पुणे, महाराष्ट्र मिरर Social News: बुधवार पेठेतील ऐतिहासिक भिडे वाडा येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीच्या कामाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकारी, अभियंते आणि वास्तुविशारदांकडून कामाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेऊन त्यांनी, स्मारकाचे काम दर्जेदार, नियोजित वेळेत, महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षांतच आणि ऐतिहासिक वारशाला साजेसे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. Social News

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी सन १८४८ मध्ये याच भिडे वाड्यात भारतातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाची क्रांतिकारी मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे भारतीय सामाजिक इतिहासात या वास्तूला विशेष महत्त्व असून ती प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणास्थान मानली जाते. पाहणी दौऱ्यावेळी भवन विभागाचे अधीक्षक अभियंता बिपीन शिंदे, कार्यकारी अभियंता धायगुडे, उपअभियंता पांडकर तसेच आर्किटेक्ट धनंजय सालकर उपस्थित होते.

पाहणीदरम्यान स्मारकाच्या वास्तुरचनेची सद्यस्थिती, विविध विकासकामे तसेच पुढील टप्प्यांतील नियोजनाची माहिती अधिकाऱ्यांनी उपमहापौर  वाडेकर यांना दिली. स्मारकात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा प्रेरणादायी अनुभव मिळेल, यासाठी आवश्यक सुविधा आणि माहितीपर उपक्रम विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात आल्या.Social News

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी वंचित, शोषित आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी केलेले कार्य संपूर्ण मानवतेसाठी दीपस्तंभ असल्याचे नमूद करण्यात आले. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करून पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वासही वाडेकर यांनी व्यक्त केला.

शेअर करा