मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Social News : ढोल-ताशांचा दणदणाट नकोच… नागरिकांचा पोलिसांना ४८ तासांचा अल्टिमेटम

पुणे, महाराष्ट्र मिरर Social News : कोंढव्यातील एनआयबीएम आणि वानवडी परिसरातील ‘रहेजा रिझर्व्ह’ येथील त्रस्त रहिवाशांनी परिसरातील वाढत्या आणि अनियंत्रित ढोल-ताशाच्या आवाजाच्या समस्येबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

VZ
vidula zagade

2 मिनिट वाचन

Social News : ढोल-ताशांचा दणदणाट नकोच… नागरिकांचा पोलिसांना ४८ तासांचा अल्टिमेटम

Social News : रहेजा रिझर्व्ह रेसिडेंट्स असोसिएशनकडून पोलिस प्रशासनाला निवेदन

पुणे, महाराष्ट्र मिरर Social News : कोंढव्यातील एनआयबीएम आणि वानवडी परिसरातील ‘रहेजा रिझर्व्ह’ येथील त्रस्त रहिवाशांनी परिसरातील वाढत्या आणि अनियंत्रित ढोल-ताशाच्या आवाजाच्या समस्येबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. सततच्या उच्च-डेसिबल आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, याप्रकरणी पुणे पोलिसांना ४८ तासांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.Social News, Maharashtra Mirror, google,

रहेजा रिझर्व्ह रेसिडेंट्स असोसिएशनच्या एका शिष्टमंडळाने पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन पूर्व विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी परिसरातील रहिवासी भागात सुरू असलेल्या ढोल-ताशा पथकांच्या सरावामुळे होणाऱ्या प्रचंड ध्वनिप्रदूषणाबाबत निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, या सततच्या आणि कर्णकर्कश आवाजामुळे परिसरातील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी रुग्ण आणि दिवसभर काम करून थकलेले नोकरवर्ग यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, अतिरिक्त आयुक्तांकडून कोणतीही ठोस व तात्काळ अंमलबजावणी करण्यायोग्य आश्वासने न मिळाल्याबद्दल रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संध्याकाळनंतर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या अनधिकृत आवाजावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी पावले उचलली गेली नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.Social News

Social News : ढोल-ताशांचा दणदणाट नकोच… नागरिकांचा पोलिसांना ४८ तासांचा अल्टिमेटम

कारवाई करा , अन्यथा आंदोलन

पोलीस प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर रहिवाशांची एक तातडीची बैठक पार पडली. यामध्ये पुणे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने कठोर कारवाई करत विनापरवाना व नियमबाह्य वाद्ये जप्त करावीत. रहिवासी क्षेत्राबाहेर सरावाचे पट्टे निश्चित करण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. या दोन दिवसांत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली नाही, तर रहिवासी शांततापूर्ण मार्गाने रस्त्यावर उतरून जाहीर आंदोलन करतील. शांततापूर्ण आणि निकोप वातावरणात जगण्याच्या मूलभूत अधिकारासाठी हा लढा उभारला जाईल, असा इशारा बैठकीत देण्यात आला आहे.

Social News : ढोल-ताशांचा दणदणाट नकोच… नागरिकांचा पोलिसांना ४८ तासांचा अल्टिमेटम

रहिवाशांनी केलेल्या मागण्या

ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २००० चे काटेकोर पालन करून रहिवासी भागात उच्च-डेसिबल आवाजावर पूर्ण बंदी घालण्यात यावी. दाट लोकवस्तीच्या गृहनिर्माण सोसायट्यांच्या जवळ होणारे ढोल-ताशांचे सराव सत्रे तातडीने लोकवस्तीपासून दूर, खुल्या औद्योगिक किंवा निर्जन भागात हलवण्यात याव्यात.
सरावासाठी एक निश्चित अंतिम वेळ ठरवून दिली जावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, वानवडी आणि एनआयबीएम पट्ट्यात ध्वनी मापक यंत्रांसह फिरणारे विशेष पोलीस पथक तैनात करण्यात यावे.Social News

Social News

शेअर करा