मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

कस्पटे चौकात एमडी ड्रग्जसह तस्कर जेरबंद

३७,४०० रुपये किमतीचे मॅफेड्रॉन ड्रग्ज, प्लास्टिक पिशव्या, चमचा आणि मोबाइल असा मुद्देमाल जप्त

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

कस्पटे चौकात एमडी ड्रग्जसह तस्कर जेरबंद

३७,४०० रुपये किमतीचे मॅफेड्रॉन ड्रग्ज, प्लास्टिक पिशव्या, चमचा आणि मोबाइल असा मुद्देमाल जप्त

पिंपरी: एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत २७ हजार ४०० रुपये किमतीचे मॅफेड्रॉन ड्रग्ज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई सोमवारी (२५ मे) रोजी सायंकाळी ५.१० वाजताच्‍या सुमारास वाकड येथील कस्पटे चौकाजवळ मुळा नदीवरील अर्धवट पुलावर करण्यात आली.

कमलेश भगवान ससाणे (३५, रा. बाणेर) असे अटक करण्यात आलेल्‍या आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार वंदु दत्तात्रय गिरे (४६) यांनी वाकड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कस्पटे चौक परिसरात एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून ५.४८ ग्रॅम एमडी पावडर, प्लास्टिक पिशव्या, चमचा आणि मोबाइल असा ३७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

शेअर करा