मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन दर्जा

परिसराच्या सर्वागीण विकासाला मोठी गती मिळणार

PG
Prashik Ghaste

1 मिनिट वाचन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटन दर्जा

परिसराच्या सर्वागीण विकासाला मोठी गती मिळणार

निलेश राऊत
पुणे: लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आता 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या परिसराच्या सर्वागीण विकासाला मोठी गती मिळणार आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरास जिल्हा नियोजन समितीकडून सध्या 'क' वर्ग दर्जा प्राप्त आहे. मात्र, या मंदिराची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा अत्यंत वैभवशाली असून, येथे दररोज देश-विदेशांतील हजारो भाविक दर्शनासाठी येतात.

समाजसेवा आणि सांस्कृतिक संवर्धनाचेही मोठे केंद्र
हे मंदिर केवळ भक्तीचे स्थान नसून समाजसेवा आणि सांस्कृतिक संवर्धनाचेही मोठे केंद्र आहे. ही बाब लक्षात घेऊन मंदिराला 'अ' वर्ग दर्जा देण्याची मागणी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी दि. ४ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यावर 'पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती या संस्थानाला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्य सरकारचा निर्णय
या निर्णयामुळे तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने या क्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे. या निणर्यामुळे पुणेकर आणि गणपती बाप्पांच्या भक्तांनी या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत केले आहे. या निर्णयामुळे मंदिराच्या वैभवात अधिक भर पडणार आहे.

शेअर करा