मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai Crime News : धक्कादायक ! विक्रोळीतील नराधमाची विकृती – 17 वर्षीय मुलीवर खिडकीतून घरात घुसून अत्याचार

Mumbai Latest Crime News : 'सांगितले तर बदनामी करीन' म्हणत धमकी; अखेर पीडितेचा धाडसी निर्णय

V
Vivek

1 मिनिट वाचन

A V JR COLLEGE , NAVGHAR, NEAR PHC CENTER, VASAI ROAD WEST

Mumbai Latest Crime News : 'सांगितले तर बदनामी करीन' म्हणत धमकी; अखेर पीडितेचा धाडसी निर्णय

मुंबई :- "राखण करणाऱ्यांचं शहर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पुन्हा एकदा असंवेदनशीलतेचा काळा अध्याय उघड झाला आहे. विक्रोळी पार्कसाईटमध्ये एका 31 वर्षीय नराधमाने 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तब्बल 20 दिवस लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी समीर शेफिक शेख (वय 31) याने 10 ते 29 मे 2025 या कालावधीत पीडित मुलीच्या राहत्या घरात खिडकीतून जबरदस्ती प्रवेश करून तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केला.

धमकीच्या छायेत जगणारी बालिका

ही बालिका भीतीने गप्प राहिली, कारण आरोपीने तिला स्पष्ट शब्दांत धमकावलेः "कोणाला सांगितलंस, तर तुझी बदनामी करीन!" तिच्या कोवळ्या मनावर ताण निर्माण झाला होता, पण अखेर 29 मे रोजी रात्री तिने धाडस करून पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या घटनेवरून पार्कसाईट पोलिसांनी ठाण्यात Vikhroli Police Station अंतर्गत BNS कलम 64(2) (D), 351 (2) आणि POCSO कायद्याच्या 4 व 8 कलमांखाली गुन्हा दाखल करून आरोपी समीर शेखला अटक केली आहे.घटना विक्रोळी पश्चिम, जैन मंदिराजवळील हिमालया बेकरीच्या परिसरात घडली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत माळी हे करत आहेत. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहे.

शेअर करा