मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Shivsena Shinde Group : राज्यात विविध पक्ष व संघटनांचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Shivsena Shinde Group Latest News : पालघर, डहाणू, संभाजीनगर, सोलापूरसह विविध जिल्ह्यांतील नेत्यांचा सहभाग,‘गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक’ अभियानास मिळणार चालना

V
Vivek

1 मिनिट वाचन

Shivsena Shinde Group : राज्यात विविध पक्ष व संघटनांचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Shivsena Shinde Group Latest News : पालघर, डहाणू, संभाजीनगर, सोलापूरसह विविध जिल्ह्यांतील नेत्यांचा सहभाग,‘गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक’ अभियानास मिळणार चालना

मुंबई :- राज्याच्या विविध भागांतील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षविस्ताराला मोठे बळ दिले आहे. काल मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात पालघर, डहाणू, छत्रपती संभाजीनगर, दादरा-नगर हवेली, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे व सोलापूर जिल्ह्यांतील विविध राजकीय व सामाजिक संघटनांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

छायाचित्रे · 1/5

Arrow Keys ⟵ ⟶

या प्रवेशांमध्ये पालघरचे माजी आमदार अमित घोडा काँग्रेसचे सरचिटणीस जितू पटेल, आगवन गावचे सरपंच रुपजी कौल,मनसेचे अनिकेत माच्छी, रिक्षा संघटनेचे जगन्नाथ ठाकूर, तसेच विपुल रमण पटेल,शोभा खताळ, संदीप पाटील,रामलीला प्रचार समितीचे पंडित राजू शर्मा यांचा समावेश होता.

छत्रपती संभाजीनगरचे उमेश महिरे दादरा-नगर हवेलीतील हेमंत झा,अशोक तिवारी,महेंद्र कटारिया धुळे जिल्ह्याचे नितीन पाटील,हेमाताई हेमाडे,सरोज कदम सोलापूरचे ज्योतिराम मदने, बलभीम पाटील मनोज नरसाणे,श्रीराम परदेशी,गणेश परदेशी यांचाही यांनी पक्षात प्रवेश होता.

एकनाथ शिंदे म्हणाले की,,‘शासन आपल्या दारी' उपक्रमाच्या माध्यमातून पाच कोटी नागरिकांना थेट लाभ मिळाला आहे. ही कामगिरी पाहूनच लोक शिवसेनेत मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे नेत 'गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक' हे ध्येय गाठण्यासाठी सर्वांना एकत्र काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेअर करा