मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Mumbai News : शिवाजी पार्कमधील सीजेपीच्या प्रस्तावित आंदोलनाला स्थानिकांचा विरोध; गोंधळ आणि दैनंदिन कामकाजावर परिणामाची चिंता

Mumbai News : मुंबई : शिवाजी पार्क येथे सीजेपीकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या आंदोलनाला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे.

VK
Vikrant Kulkarni

2 मिनिट वाचन

शिवाजी पार्कमधील सीजेपीच्या प्रस्तावित आंदोलनाला स्थानिकांचा विरोध; गोंधळ आणि दैनंदिन कामकाजावर परिणामाची चिंता
शिवाजी पार्कमधील सीजेपीच्या प्रस्तावित आंदोलनाला स्थानिकांचा विरोध; गोंधळ आणि दैनंदिन कामकाजावर परिणामाची चिंता

Mumbai News : मुंबई : शिवाजी पार्क येथे सीजेपीकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या आंदोलनाला स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. वारंवार होणाऱ्या आंदोलनांमुळे परिसरातील शांतता भंग होत असून, गर्दी आणि गोंधळाचा स्थानिकांच्या दैनंदिन कामकाजावर तसेच व्यवसायांवर परिणाम होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

सीजेपीकडून आज शुक्रवारी (दि.२) शिवाजी पार्कच्या गेट क्रमांक ६ येथे दुपारी ४ वाजता आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षाने या आंदोलनाला आपल्या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात म्हटले आहे. मात्र, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील स्थानिकांनी आधीच नाराजी व्यक्त केली आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai News

स्थानिक रहिवासी टी. टी. पावस्कर यांनी सांगितले की, त्यांचा आक्षेप आंदोलन करण्याच्या अधिकाराला नसून आंदोलनाची पद्धत आणि त्यासाठी निवडलेल्या जागेला आहे. संविधानाने नागरिकांना शांततापूर्ण पद्धतीने निषेध करण्याचा अधिकार दिला आहे; मात्र त्यासाठी नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्थानिकांच्या मते, शिवाजी पार्क परिसरात शांततापूर्ण वातावरण कायम राहणे गरजेचे आहे. आंदोलनाच्या वेळी होणारी गर्दी आणि संभाव्य गोंधळामुळे नागरिकांची गैरसोय होऊ शकते, अशी त्यांची चिंता आहे.

एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, त्यांचे कार्यालय याच परिसरात आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनांमुळे काही कर्मचारी कार्यालयात येण्यास घाबरले आणि त्यांना घरीच थांबावे लागले. परिणामी कार्यालय बंद ठेवण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या आंदोलनांमुळे कामकाजात व्यत्यय येत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

आंदोलनाला पोलिसांची परवानगी आहे का?
स्थानिकांनी दावा केला आहे की, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. असे असतानाही आंदोलनाची तयारी सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परिसरातील कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, सीजेपीने आंदोलनाची तयारी पूर्ण केली असून, देशातील विविध शहरांमध्ये आंदोलनांची घोषणा केली आहे. मुंबईनंतर गोवा, कोलकाता, पाटणा, उत्तर प्रदेश आणि बंगळुरू येथेही आंदोलन करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांनी मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर ऑक्टोबरच्या अखेरीस जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

दीपके यांच्या मते, सीजेपीच्या तीन प्रमुख मागण्या आहेत. त्यामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी, एसआयआरदरम्यान वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी आणि २०२५ ची मतदार यादी कायम ठेवण्याची मागणी यांचा समावेश आहे.

याशिवाय, पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची मागणीही पक्षाने केली आहे. आंदोलनासाठी परवानगी मिळाली नसली तरी आंदोलन करण्यात येईल, अशी भूमिका दीपके यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडूनही ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत आगामी काळात निवडणूक आयोगाशी संबंधित आंदोलनांमुळे राजकीय वातावरण अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

शिवाजी पार्कमधील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिकांचा विरोध समोर आला असून, आंदोलनाचा नागरिकांच्या शांतता, वाहतूक आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेअर करा