मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Pune Crime : शिरूरमधील चोरीच्या गुन्ह्यांची उकल; साडेअठरा लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : शिरूर शहरात घडलेल्या घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा, सासवड आणि शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 मिनिट वाचन

शिरूरमधील चोरीच्या गुन्ह्यांची उकल; साडेअठरा लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरूरमधील चोरीच्या गुन्ह्यांची उकल; साडेअठरा लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime : तीन संशयित ताब्यात ; पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : शिरूर शहरात घडलेल्या घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा, सासवड आणि शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १८ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. आरोपींच्या इतर फरार साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत. सुरज भिमा निंबाळकर (रा. डोर्लेवाडी, ता. बारामती), शंकर तायप्पा घोरपडे, संगम लाला शिंदे (दोघे रा. लासुर्णे, ता. इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.https://maharashtramirror.com/ Pune Crime
शिरूर येथील स्टेट बँक कॉलनीमधील बीएसएनएलच्या ऑफिसचे १२ जुलै रोजी कुलूप तोडून कंपनीचे मदरबोर्ड आणि पीसीबी बोर्ड चोरून नेण्यात आले होते. त्याचदिवशी वाडा कॉलनीतील एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी झाली होती. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळाचा आढावा घेतला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासुर्णे भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी पोलिसांनी लासुर्णे परिसरात धाड टाकून वरिल तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी शिरूरमधील घरफोडीची कबुली दिली.https://maharashtramirror.com/ Pune Crime
पोलीस कोठडीदरम्यान आरोपींच्या माहितीवरून चोरीस गेलेले १२१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २०० ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण १८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आरोपींनी ही घरफोडी इतर साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली असून, उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. शिरूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पुढील तपस करत आहेत.

शेअर करा