मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

Share Market Fraud : शेअर गुंतवणुकीच्या जाळ्यात अडकून कल्याणच्या महिलेची 60 लाखांची फसवणूक

Kalyan Share Market Fraud News : 'प्रशिक्षण' आणि 'नफा' दाखवून 50 हजारांपासून सुरू केली फसवणूक

V
Vivek

1 मिनिट वाचन

Kalyan Share Market Fraud News : 'प्रशिक्षण' आणि 'नफा' दाखवून 50 हजारांपासून सुरू केली फसवणूक

कल्याण :- कमी काळात शेअर मार्केटमध्ये बंपर नफा मिळवून देण्याच्या आमिषाने ऑनलाईन भामट्यांनी कल्याणमधील एका महिलेला तब्बल 60 लाख 55 हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Kalyan Share Market Fraud News मे ते जुलै या तीन महिन्यांच्या कालावधीत ही फसवणूक झाली असून, महात्मा फुले पोलीस ठाण्यात या प्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Kalyan Latest Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एका विमा कंपनीत नोकरी सोडलेल्या पीडित महिलेला त्यांच्या बहिणीने एका शेअर गुंतवणूकविषयक माहितीची लिंक पाठवली होती. ती लिंक उघडताच महिलेचा संपर्क चार आरोपींशी झाला. या भामट्यांनी त्यांना शेअर गुंतवणुकीचे मार्गदर्शन देण्यास सुरुवात केली. सुरवातीला, ‘प्रशिक्षण अभ्यासक्रम’ पूर्ण करण्याच्या नावाखाली महिलेकडून 999 रुपये भरून घेण्यात आले.

या आरोपींनी महिलेला छोट्या रकमांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. महिलेने त्यांच्या बँक खात्यावर 50 हजार ते 1 लाखांच्या रकमा पाठवल्या. काही दिवसांतच ऑनलाइन माध्यमांवर त्यांना 58 लाखांचा 'नफा' दिसू लागला. यामुळे महिलेचा विश्वास वाढला आणि त्या आणखी गुंतवणूक करत राहिल्या.

जेव्हा महिलेने नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी 80 लाख रुपये भरले तरच ही रक्कम काढता येईल, असे सांगितले. एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नसल्याचे महिलेने सांगितल्यावर, भामट्यांनी मूळ गुंतवणूक आणि नफ्याची रक्कमही परत देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पंकज भारद्वाज, गोपाळ लोराया, भाग्यश्री आणि प्रीती या चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा