मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Gokul Election 2026 : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजेश पाटील यांची वर्षभरासाठी अध्यक्षपदी निवड, खासदार धनंजय महाडिकांनी सांगितला फॉर्म्युलाDevendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंसोबत काम करून माझा अनुभव वाढला”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाने राजकीय वर्तुळात रंगल्या चर्चामंत्री प्रताप सरनाईक यांच्या संजय राऊतांवरील भेटीमागील कारणांची चर्चा; कौटुंबिक सदिच्छा भेट असल्याचे स्पष्टMumbai News : जुहूमध्ये फटाका फोडण्याच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; विलेपर्ले परिसरातील खळबळजनक घटनाप्रकरणी दोघांना अटकDiwali Padwa 2026 : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘दिवाळी पाडव्या’चे अद्वितीय महत्त्व; बळीराजाची स्मृती, व्यापारी वर्गाचे नवे पर्व आणि नात्यांमधील गोडव्याचा सोहळा!दिवाळी पाडवा 2026: स्नेहीजनांना पाठवण्यासाठी सुंदर शुभेच्छा आणि संदेश; नात्यांमध्ये गोडवा आणणारा सण

घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू… शरद पवार गटांकडून व्हिडिओ व्हायरल

Sharad Pawar Shared Old Video On Twitter : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जुना व्हिडिओ शेअर करत विरोधकांना उत्तर

V
Vivek

1 मिनिट वाचन

Sharad Pawar Old video Shared

Sharad Pawar Shared Old Video On Twitter : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून जुना व्हिडिओ शेअर करत विरोधकांना उत्तर

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार Sharad Pawar गटाने बुधवारी शरद पवार यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओत शरद पवार वंशाच्या दिव्यावर आपले पुरोगामी विचार मांडताना दिसून येत आहेत. घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचा दिवाही तेवत ठेवू शकते, असा पुढारलेला विचार केवळ शरद पवारांसारखा दृष्टा नेताच रुजवू शकतो, असे शरद पवार गटाने हा व्हिडिओ ट्विट करताना म्हटले आहे. विशेषतः मुलीला मुलासारखे वाढवून, समान संधी देऊन तिच्याकडून उत्तम काम करून घेऊ शकतो, असा विश्वासही पवार या व्हिडिओत व्यक्त करताना दिसून येत आहेत. Sharad Pawar Shared Old Video On Twitter

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ट्विट केलेल्या व्हिडिओत मुलाखतकार शरद पवारांना विचारतात की, आपल्या देशात मुलगा हा वंशाचा दिवा असे मानतात, मग तुम्हाला एकच मुलगी का? तुम्ही यासंबंधीच्या प्रश्नांना सामोरे कसे जाता? त्यावर शरद पवार म्हणतात, हा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो. विशेषतः ग्रामीण भागात गेल्यानंतर हा प्रश्न केला जातो. मुलगा असता तर बरे झाले असते. शेवटी नाव चालवण्यासाठी, बरे वाईट झाल्यानंतर अग्नी देण्यासाठी मुलगा पाहिजे, असे म्हटले जाते. माझ्या मते, हा प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन आहे. अग्नी देण्यासाठी कुणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची की जीवंत असताना नीटनेटके वागण्याची चिंता करायची. Sharad Pawar Shared Old Video On Twitter

रा ष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने ट्विट काय?

घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते… असा पुढारलेला विचार आदरणीय श्री. शरद पवार साहेबांसारखा द्रष्टा नेताच रुजवू शकतो. म्हणून महाराष्ट्र देशातील इतर राज्यापेक्षा वेगळा ठरतो. बाकी बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा, आडनावाची फुशारकी, माहेरवास, सासुरवास ह्यात रमू दे, त्यांना प्रागतिक महाराष्ट्र कळलाच नाही, असे शरद पवार गटाने आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.

हेही वाचा: जागांबाबत संजय निरुपम यांचा मोठा दावा, '…म्हणूनच अनेक नेते मोबाईल बंद करून पोहोचले नाहीत'

शेअर करा